आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तृतीयपंथी आम्रपाली अडकणार आज लग्नाच्या बेडीत; सोहळ्यासाठी राज्यभरातून तृतीयपंथी शहरात दाखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- शहरातील निंभोरा येथील रहिवासी तृथीयपंथी आम्रपाली जोग चौधरी मनमाडचे नांदगाव येथील ट्रान्सपोर्ट व्यवसायी संदीप सोनोने यांच्याशी आज (५ जुलै) विवाह बंधनात अडकणार आहे. या विवाहाबाबत सर्वत्र उत्सुकता आहे. सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्यभरातून तृतीयपंथी शहरात आले आहेत. 


सर्वसामान्यांचा विवाह सोहळा असतो त्याचप्रमाणे पवार मंगलम येथे सायंकाळी ६ वाजता हा विवाह होणार अाहे. या आधीही जिल्ह्यात अशाप्रकारे तृतीयपंथीयांचे विवाह झाल्याची माहिती समाजसेविका गुंजन गोळे यांनी दिली. विवाहाच्या पूर्वसंध्येला धुमधडाक्यात संगीताचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मोठ्या संख्येत वऱ्हाडी उपस्थित होते. त्यानंतर हळदीचा कार्यक्रमही यथासांग पार पडला. हळदीचे जेवणही देण्यात आले. आपल्याला उत्तम जोडीदार मिळावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते त्याचप्रमाणे आम्रपालीलाही उत्तम जोडीदार मिळाला असून तिचा संसार सुखात व्हावा, अशी इच्छाही गुंजन गोळे यांनी व्यक्त केली. 

बातम्या आणखी आहेत...