आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपसी वादातून संतप्त पतीने केले पत्नीवर चाकूने वार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- आपसात वाद असल्यामुळे मागील जवळपास दोन वर्षांपासून पती व पत्नी विभक्त राहतात. तसेच या दाम्पत्याचे तीन अपत्य पतीकडे राहतात. दरम्यान या पती पत्नीचे प्रकरण न्यायालयातही सुरू आहे. त्यामुळे त्यांच्यात यापुर्वीही खटके उडायचे. शुक्रवारी (दि. २२) सांयकाळी पतीसोबत पत्नीचा पुन्हा वाद झाला. यावेळी संतप्त पतीने पत्नीवर चाकूने सपासप वार केले. यामध्ये पत्नी गंभीर जखमी झाली आहे. 


यास्मीन मिलोफर शे. रशीद (३५) असे गंभीर जखमी झालेल्या महीलेचे तर शेख रशीद शेख हबीब (४२, दोघेही रा.हबीब नगर क्रमांक २, अमरावती) असे हल्लेखोर पतीचे नाव आहे. शेख रशीद हा ट्रकचालक म्हणून काम करतो. यास्मीन मिलोफर व शेख रशीद यांच्यात मागील काही वर्षांपासून वाद सुरू आहे. त्यामुळे यास्मीन तीच्या आईकडे राहते. याचवेळी तीन मुलं व पती वेगळा राहतो. मुलांच्या भेटीसाठी ईदच्या दिवशी यास्मीन पती राहतो, त्या घरी गेली होती. ही बाब रशीदला माहीत झाली होती. दरम्यान शुक्रवारी सांयकाळी चार वाजताच्या सुमारास पुन्हा यास्मीन मुलांना भेटण्यासाठी गेली असता त्याचवेळी रशीद घरी आला. यास्मीन कशी काय घरी आली, या कारणावरून त्यांच्यात वाद झाला. सुरूवातीला बाचाबाची झाली. यामुळे संतप्त झालेल्या शेख रशीदने चाकू काढून यास्मीनच्या शरिरावर सपासप वार केले. यामध्ये ती रक्तबंबाळ झाली. परिसरातील नागरीक व आईने तीला तातडीने इर्विन रुग्णालयात दाखल केले. दुसरीकडे शेख रशीद स्वत:च गाडगेनगर पेालिस ठाण्यात पोहचला व त्याने ही माहीती पोलिसांना दिली. पोलिसांनी या प्रकरणात शेख रशीदविरुध्द प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू केली होती. घटनेची माहीती मिळाल्यामुळे गाडगेनगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी तसेच इर्विन रुग्णालयात धाव घेतली होती. 

बातम्या आणखी आहेत...