आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nagpur
  • वंशाचा दिवा मुलगाच हवा म्हणून पत्नीवर जीवघेणा हल्ला,attack On Wife For Demand Of Son In Yawatmal

वंशाचा दिवा मुलगाच हवा म्हणून पत्नीवर जीवघेणा हल्ला, पतीसह सासऱ्याला अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ  - वंशाला दिवा मुलगाच हवा म्हणून पतीने पत्नीवर विळ्याने वार करून जीवघेणा हल्ला केला. ही घटना दि. 19 जून रोजी लाडखेड पोलीस स्टेशन हद्दीतील लासिना येथे घडली होती. शिला कवडु राठोड असे जखमीचे नाव आहे. या प्रकरणी पोलीसांनी पती कवडू राठोड आणि सासरा सोमा राठोड दोघेही रा. लासिना यांना अटक केली आहे. 
 
पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनूसार, शिला व कवडू राठोड ह्यांचा 2009 साली विवाह झाला. त्यांच्या संसारवेलीवर एकापाठोपाठ एक तीनही मुलीच झाल्या. शिला ह्यांना पहिली मुलगी झाल्यानंतर पती कवडू निराश झाला होता. त्याला मुलगा हवा होता. त्यानंतर शिला हिला दुसरीही मुलगीच झाली म्हणून कवडू याने शिलाला मारझोड करून तिला त्रास देणे सुरु केले. त्यानंतर दि. 5 जूनला शिला ने तिसऱ्याही मुलीलाच जन्म दिला आणि कवडू व त्याचे कुटुंबीय संतापले.


तुला मुलीचं होतात त्यामुळे आता तुला वागवायचे नाही असे सांगून कवडू याने दि. 19 जुन रोजी शिलावर विळ्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. शिलाच्या हातावर आणि डोक्यावर विळ्याचे वार घालून पती कवडू राठोड पसार झाला होता. तर जखमी शिला राठोड हीच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखसल करण्यात आले होते.  


या प्रकरणी लाडखेड पोलीसांनी पती कवडूसह सासू सासऱ्यांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे नोंदवून त्यांचा शोध सुरू केला होता. अशातच मंगळवार, दि. 26 जुन रोजी पती आणि सासरा लासिना येथे आल्याची माहिती पोलीसांना मिळाली. त्यावरून ठाणेदार सारंग मिराशी यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लासिना गाठून दोघांना अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार सारंग मिराशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.

बातम्या आणखी आहेत...