आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nagpur
  • Breaking News: पीककर्ज मंजुरीसाठी बँक अधिकार्‍याने शेतकर्‍याच्या पत्‍नीला केली शरीरसुखाची मागणी Bank Officer Demand Physical Relation To Farmers Wife For Sanctioning Of Crop Loan In Maharashtra

पीक कर्जासाठी शेतकऱ्याच्या पत्नीला शरीरसुखाची मागणी; बँक मॅनेजरसह शिपायावर गुन्हा दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मलकापूर- पीक कर्जासाठी दाताळा (जि. बुलडाणा) येथील सेंट्रल बँकेच्या व्यवस्थापकाने शरीरसुखाची मागणी केली, अशी तक्रार एका शेतकऱ्याच्या पत्नीने पाेलिसात दिली. त्यावरून बँक व्यवस्थापक व शिपायावर गुन्हे दाखल केले. त्यामुळे दाेन्ही अाराेपी फरार झाले. 


उमाळाचा शेतकरी पत्नीसोबत पीक कर्जासाठी गुरुवारी सकाळी बँकेत गेला होता. व्यवस्थापक राजेश हिवसे याने कागदपत्रांची पाहणी करून त्यांच्याकडे माेबाइल नंबर मागितला. त्यावर शेतकऱ्याने पत्नीचा नंबर दिला. हिवसे याने शेतकऱ्याच्या पत्नीला फोन लावून 'कर्ज हवे असेल तर माझ्या रूमवर या,' असे सांगत शरीर सुखाची मागणी केली. तर शिपाई मनोज चव्हाण यानेही 'तुम्ही साहेबांना खुश करा,' असे सांगितले हाेते. दरम्यान, संबंधित महिलेने मॅनेजरचे काॅल रेकॉर्डिंग करून ग्रामीण पोलिसात तक्रार दिली हाेती. 

 

अश्‍लील संभाषण मोबाईलमध्‍ये रेकॉर्ड

मोबाईलवरील सर्व संभाषणाचे महिलेने रेकॉर्डिंग करून ठेवले होते. त्‍यानूसार मलकापूर ग्रामीण पोलिसात गुरूवारी याविषयी त्‍यांनी तक्रार दिली. तक्रारीची दखल घेत पोलिसांनी गुरूवारी रात्री शाखाधिकारी राजेश हिवसे व शिपाई मनोज चव्‍हाण यांच्‍याविरोधात विविध कलमांतर्गत तसेच अनुसुचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वयेही गुन्हा दाखल केला. गुन्‍हा दाखल होताच दोन्‍ही आरोपी फरार झाले आहेत. पुढील तपास पोलिस उपविभागीय अधिकारी गिरीश बोबडे करत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...