आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालघर आणि भंडारा-गाेंदिया लाेकसभा मतदारसंघाच्या पाेटनिवडणुकीची आज मतमाेजणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर -   भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात मंगळवारी झालेल्या मतदानाच्या वेळी काही केंद्रांवर ईव्हीएम यंत्रात गाेंधळ झाल्याच्या तक्रारी हाेत्या. त्यामुळे बुधवारी ४९ केंद्रांवर फेरमतदान घेण्यात अाले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुमारे ४६ टक्के मतदान झाल्याची माहिती आहे. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रांमधील बिघाडाच्या घटनांमुळे या मतदारसंघातील ४९ केंद्रांवर फेरमतदान घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला होता.

 

त्यानुसार बुधवारी या केंद्रांवर शांततापूर्ण वातावरणात मतदान पार पडले. पोटनिवडणुकीबाबत मतदारांमध्ये फारसा उत्साह नसल्याने सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुमारे ४६ टक्के मतदान झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. 


पालघरमध्ये चुरशीची लढत पालघर व भंडारा-गाेंदिया लाेकसभा मतदारसंघाच्या पाेटनिवडणुकीची मतमाेजणी गुरुवारी हाेणार अाहे. भंडाऱ्यात १८ उमेदवार रिंगणात असून थेट लढत भाजपचे हेमंत पटले आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे मधुकर कुकडे या दोन उमेदवारांमध्येच असल्याचे दिसून आले आहे. तर पालघरमध्ये शिवसेनेचे श्रीनिवास वनगा व भाजपचे राजेंद्र गावित यांच्यात  चुरशीची लढत हाेणार अाहे.

 

बातम्या आणखी आहेत...