आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EVM घोटाळा: भंडारा गोंदियात 49 ठिकाणी फेरमतदान, जिल्ह्याधिका-यांची तडकाफडकी बदली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भंडारा- भंडारा- गोंदियात सोमवारी लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडले मात्र मतदान केंद्रावर EVM आणि VVPAT बिघाड झाल्यामुळे मोठा गोंधळ उडाला. 75 ठिकाणी मशीन बंद पडल्याने मतदान थांबववावे लागले होते. आता उद्या 49 जागांवर फेरमतदान घेण्यात येणार आहे या दरम्यान यामुळे वादग्रस्त ठरलेले गोंदियाचे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांची तडकाफडकी बदलीचे केली आहे. काळे यांच्या जागेवर नागपूर जिल्हा परिषदेच्या विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कांबदरी बलकवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


काल जवळपास 75 मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन बंद पडल्या होत्या. त्यापैकी  35 ठिकाणी तक्रारी सोडवू शकलो नाही, त्यामुळे मतदान थांबवण्यात आलं होतं अशी माहिती  सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अनंत वालसकर माध्यमांशी बोलताना दिली होती. निवडणूक आयोगाने एकूण 49 ठिकाणी फेरमतदान करण्याचा निर्णय घेतला आहे.  

 

 

बातम्या आणखी आहेत...