आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योग्यवेळ आल्यावर \'बॉम्ब\' टाकणार; काटोलचे आमदार आशीष देशमुख यांचे सूचक वक्तव्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- हिवाळी अधिवेशनाच्या एक दिवसाआधी काटोलचे आमदार आशीष देशमुख यांनी स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मात्र त्याची गांभीर्याने दखल घेतली नाही. विधानभवन परिसरात त्यांना याबाबत विचारले असता त्यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला. पत्रकारांनी बोलण्याचा आग्रह केल्यानंतर त्यांनी योग्य वेळी  'बॉम्ब' टाकणार असल्याचे संकेत दिले.

 

 

देशमुख यांच्या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ काढले जात असून त्याची चर्चा होत आहे. काटोल मतदारसंघाचे भाजप आमदार आशिष देशमुख यांनी सरकारच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करत  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सात पानांचे पत्र लिहिले होते, ज्यात स्वतंत्र विदर्भाची मागणी ही रास्त असल्याचे म्हटले होते. 

 

 

फडणवीस सरकारने गेली तीन वर्षे प्रयत्न करूनही राज्यातील लोकजीवनात काही परिणामकारक बदल झालेला नाही. शेतकरी सुखी नाही, युवकांना रोजगार नाही, पिकांना भाव नाही, कायदा - सुव्यवस्था अधिक बिघडली आहे, नागपूर क्राइम कॅपिटल बनले आहे, असे आशिष देशमुख यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले होते. 

 

 

आशिष देशमुख यांनी स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती आणि त्याविषयीची गरज या सात पानांच्या पत्रात सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. नागपूर मेट्रो, स्मार्ट सिटी, समृद्धी महामार्ग यांसारख्या प्रकल्पामुळे जनतेचा फायदाच होणार आहे. या प्रकल्पांवर हजारो कोटी खर्च होत आहेत. मात्र या कामासाठी लागणारा पैसा लहान उद्योगांना सबसिडी म्हणून दिला असता तर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली असती, असे मत आशिष देशमुख यांनी व्यक्त केले होते.

 

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ठोस कार्यक्रमाची मागणी

मेट्रो रेल्वे प्रकल्प रोखून शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ठोस कार्यक्रम हाती घ्यावा, अशीही मागणी आशिष देशमुख यांनी या पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली होती. राज्य सरकार केवळ शहरी विकासाकडे लक्ष देत आहे. ग्रामीण जनता आणि शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही करत आशिष देशमुख यांनी सरकारला घरचा आहेर दिला होता.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

 

बातम्या आणखी आहेत...