आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकाने केली लिंगबदलाला परवानगी देण्याची मागणी, कारण वाचून व्हाल चकित

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुलडाणा- जिल्हा परिषदेच्या एका शाळेतील शिक्षकाने लिंगबदलाची मागणी केली आहे. त्याच्या या मागणीनचे कारण एेकून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षक बदल्यांमध्ये एकल शिक्षकांवर (ज्यांची पत्नी सेवेत नाही) अन्याय झाल्याचा आरोप करत त्याने केला आहे. बदल्यांमध्ये सेवा ज्येष्ठतेप्रमाणे पसंतीक्रमानुसार गाव मिळण्याऐवजी महिलांना प्राधान्य देण्यासाठी अनेक शिक्षकांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे या मागणीची फेरविचार करावा अन्यथा लिंगबदलाला परवानगी द्यावी अशी मागणी त्याने केली आहे. 

 

विनोद माळोदे यांनी निवेदनाद्वारे जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्याकडे केली आहे. राज्य शासनाच्या बदली प्रक्रियेअंतर्गत संवर्ग १ ते ४ मधील शिक्षक बदल्यानंतर १२ जूनला संवर्ग ५ मधील शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचा आदेश १३ जूनला प्राप्त झाला आहे. या आदेशात पसंतीक्रमानुसार गावे न मिळाल्याने सेवाज्येष्ठ एकल शिक्षकांवर अन्याय झाला आहे. या बदल्यांमध्ये महिलांना प्राधान्य देण्यात आले असून सेवा कनिष्ठ महिलांनादेखील नियम डावलून हस्तक्षेप करुन बदली देण्यात आली आहे. वरकरणी संगणकीय प्रक्रिया भासवून ही बदली देण्यात आली असा आरोप त्याने केला आहे. सेवाज्येष्ठता डावलून पसंतीक्रमातील १९ वे आणि तालुक्याबाहेरील गाव देणे, हे अन्यायकारक असल्याचे माळोदे म्हणाले.  प्राधान्याने पसंतीचे गाव मिळावे अथवा लिंगबदलाची परवानगी द्यावी, अशी मागणी माळोदे यांनी केली आहे. 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...