आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्‍यातील सिंचन प्रकल्‍पांसाठी 1 लाख 15 हजार कोटींची केंद्राची घोषणा, पावसाळा संपताच सुरू होणार कामे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- राज्‍यातील सिंचन प्रकल्‍पांसाठी 1 लाख 15 हजार कोटी रुपयांची घोषणा केंद्र सरकारतर्फे करण्‍यात आली आहे. आज बुधवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकार परिषदेत यासंबंधी माहिती दिली. राज्‍यातील शेतक-यांच्‍या आत्‍महत्‍या रोखण्‍यासाठी क्रेंद सरकारने 'बळीराजा संजीवनी' ही महत्‍त्‍वकांक्षी योजना राबविण्‍याचे ठरवले असून याअंतर्गत राज्‍यातील 91 सिंचन प्रकल्‍प पुर्ण करण्‍यात येणार आहे, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली.


पावसाळा संपताच या योजनेत समाविष्‍ट सिंचन प्रकल्‍पांची कामे युद्धपातळीवर सुरू करण्‍यात येणार आहे. यामध्‍ये मराठवाड्यातील 17 तर विदर्भातील 66 प्रकल्‍पांचा समावेश असणार आहे. राज्‍याचे सिंचन क्षेत्र 18 टक्‍कयांवरून 40 टक्‍क्‍यांपर्यंत नेण्‍याचे महत्‍त्‍वकांक्षी उद्दीष्‍ट या योजनेद्वारे पुर्ण केले जाणार आहे. या योजनेमुळे राज्‍यातील अनेक अर्धवट प्रकल्‍प पुर्ण होण्‍याची शक्‍यता आहे, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली.

 

या प्रकल्‍पांचा समावेश
टेंभू (सातारा), उमरोडी (सातारा), सुलवडे-जंफाळ (धुळे), शेलगाव धरण (जळगाव), घुंगशी धरण (अकोला), पूर्णा धरण (अकोला), जिगांव (बुलडाणा), वरखेड-लोंढे (जळगाव) या प्रकल्पांचा या योजनेत समावेश करण्‍यात आला आहे.

 

 

 

बातम्या आणखी आहेत...