आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतंजली फूड पार्कवरून चंद्रकांत पाटील- संजय दत्त यांच्यात खडाजंगी; मुंडेंसोबतही शाब्दिक चकमक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- मिहानमधील पतंजली फूड पार्कसाठी स्वस्त दरात जागा का देण्यात आली, असा प्रश्न संजय दत्त यांनी लक्षवेधीतून उपस्थित केला. त्यावरील चर्चेच्या उत्तरात राज्यमंत्री मदन येरावार यांनी जागा नियमानुसार देण्यात आल्याचे सांगितले.

 

येरावार यांनी सांगितले की, यासाठी ग्लोबल टेंडर काढण्यात आले होते. सुरूवातीला दोनच दावेदार आले. म्हणून तिसऱ्यांदा निविदा काढण्यात आली. त्यात पतंजली फूडची एकच निविदा असल्याने त्यांना जागा देण्यात आली. जागा अविससित असल्याने कमी दरात देण्यात आल्याचे येरावार यांनी स्पष्ट केले. त्यावर सदस्यांचे समाधान न झाल्याने त्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही प्रश्न उपस्थित केले.

 

चंद्रकांत पाटील-संजय दत्त यांच्यात खडाजंगी
राज्यमंत्री मदन येरावार यांच्या उत्तरावर समाधान न झाल्याने संजय दत्त यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यावरून सभागृह नेते चंद्रकांत पाटील व संजय दत्त यांच्यात खडाजंगी उडाली. एका लक्षवेधीला किती वेळ द्यायचा? असे चंद्रकांत पाटील म्हणाले. उत्तराने समाधान झाले नसेल तर तुम्ही बाहेर जाऊन प्रश्न मांडा, त्यासाठी वेगवेगळी माध्यमे आहे. आंदोलने करा वा न्यायालयात जाऊ शकता, असे चंद्रकांत पाटील यांनी सुनावले.

 

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासोबतही शाब्दिक चकमक उडाली. त्यावर मुंडे यांनी, एकतर पतंजली माझा नाही, मी बाबा नाही व मला योगासने येत नाही, असा हल्लाबोल केला. अॅप्रोच रोडला किती खर्च झाला, हे सांगायला तयार नाही. दीड वर्षात तीनदा लक्षवेधी आली आहे. एक तर उत्तर नीट द्या नाही तर राखून ठेवा, असे मुंडे यांनी सुनावले.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो..

बातम्या आणखी आहेत...