आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आम्ही कागदी नाही तर खरे वाघ; पूर्व विदर्भातील मेळाव्यात मुख्यमंत्र्यांची शिवसेनेवर सडकून टीका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- आपला पक्ष मॅन टू मॅन आणि हार्ट टू हार्ट असा पक्ष असून तो मीडियाच्या भरवशावर चालणारा नाही. आम्ही कागदी वाघ नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. कोराडीत पूर्व विदर्भातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्याच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. 


कोणाचेही नाव न घेता मुख्यमंत्र्यानी "काही नेते फक्त वर्तमानपत्रांत बातम्या छापून आणून स्वतःला मोठे नेते समजतात', असे टीकास्त्र सोडले. भाजप कार्यकर्त्यांना ते म्हणाले, तुम्हीच खरे टायगर्स आहात. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून काँग्रेस आपल्या कामाबद्दल भ्रम पसरवण्याचे काम करीत आहे असा आरोपही त्यांनी केला. 

बातम्या आणखी आहेत...