आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंढरपूर देवस्थान समितीवर सहअध्यक्ष नेमण्याचा अध्यादेश विधानसभेत मंजूर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- पंढरपूर देवस्थान समितीवर वारकऱ्यांचा प्रतिनिधी असावा म्हणून सहअध्यक्षाचे पद तयार करावे आणि वारकरी संस्थांनी सुचवलेल्या व्यक्तीची त्या पदावर नेमणूक करावी, अशी सुधारणा असलेला अध्यादेश बुधवारी विधानसभेत चर्चेनंतर मंजूर करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारकऱ्यांची मागणी असल्याने संबंधित सुधारणा करीत असल्याचे यावेळी सांगितले.  मंदिराचे अध्यक्ष पायाभूत सुविधांच्या बाबी पाहणार असून सहअध्यक्ष वारकरी संप्रदायातील असल्याने आणि त्याला संप्रदायाचा चालीरीती आणि प्रथांची जाण असल्याने तो पूर्जा अर्चा व अन्य धार्मिक गोष्टी पाहील, असे त्यांनी स्पष्ट केले.  


श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीमार्फत पंढरपूर येथील मंदिराचे व्यवस्थापन केले जाते. मंदिर समितीच्या अध्यक्षपदी राज्य सरकारने अतुल भोसले यांची निवड केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. वारकरी संप्रदायाने अध्यक्षपदी राजकीय व्यक्तीला विराेध केला हाेता. तसेच वारकरी संप्रदायातील व्यक्ती देवस्थान समितीवर असावी अशी मागणी केली होती. त्यानुसार मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहअध्यक्ष पद निर्माण करुन पंढरपूर मंदिरे अधिनियम  १९७३ मधील कलम २१  (१) क मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे सुधारणा केली. सन २०१७ चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक ६१- पंढरपूर मंदिर (सुधारणा) विधेयक २०१७ गुरुवारी विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले. 

बातम्या आणखी आहेत...