आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी सरकारविरोधात काॅंग्रेसने काढली पदयात्रा, मनसेने दिला पाठिंबा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आर्णी(यवतमाळ)- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 मार्च 2014 साली दाभडी येथे  चाय पे चर्चा हा कार्यक्रम केला होता. त्या दरम्यान शेतकऱ्यांना एकुण 16आश्वासन दिली होती. त्या पैकी मोदी सरकारने एकही आश्वासन न पुर्ण केल्याने काँग्रेसचे माजी मंत्री अॅड,शिवाजीराव मोघे यांनी 5 एप्रिल पासून मोदी सरकार विरोधात पदयात्रा सुरू केली. पांढरकवडा ते दाभडी(आर्णी) अशा एकुण 90 किलोमीटरचा प्रवास करून आज 8 एप्रिल रोजी दाभडी येथे काँग्रेसची पदयात्रा दाखल झाली.

 

त्या दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शेतकऱ्यांऱ्या मुद्यावर काँग्रेसच्या पदयात्रेला पांठीबा दिला. आज दाभडी येथे दुपारी दोन वाजता या पदयात्रेचा समारोप होणार असून यावेळी खासदार राजीव सातव ,महासचिव अखिल भारतीय युवक काँग्रेसच्या प्रतिमा रघुवंनी सह आदी काॅंग्रस नेते सभेला मार्गदर्शन करणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...