आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजपचे लॉबिंग सुरू; काँग्रेस मात्र सक्षम तुल्यबळ उमेदवाराच्या शोधात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेचा मतदारसंघ कायम ठेवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने लॉबिंग सुरू केली असताना काँग्रेस मात्र अद्याप उमेदवाराच्या शोधात आहे. नामांकन दाखल करण्यास कमी कालावधी शिल्लक असल्याने मतदारांसोबत नागरिकांमध्ये निवडणुकीबाबत उत्सुकता शिगेला पाेहोचली आहे. 


भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून प्रवीण पोटे यांनी नामांकन अर्ज सादर केल्यानंतर मतदारांसोबत संपर्क साधण्यास सुरूवात केल्याची माहिती आहे. ४३८ मतदार संख्या असलेल्या स्थानिक संस्था मतदारसंघात अपक्षांसह भारतीय जनता पक्षाच्या बाजूने २१३ मतदार असल्याचे पोटे यांचे म्हणणे आहे. २१३ मतदार सोडले तर २२५ मतदार शिल्लक राहतात. यामध्ये काँग्रेससह अन्य विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींचा समावेश आहे. अमरावती महापालिकेत प्रथमच भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक मोठ्या संख्येने निवडूण आले आहेत. मात्र पक्षातील अंतर्गत गटबाजी शिगेला पोहोचली असल्याने त्याचा फटका विधान परिषद निवडणुकीत बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तविली जात आहे. महापालिकेत काँग्रेस, एमआयएम, बसपा आदी विरोधी पक्षाचे संख्याबळ देखील तूल्यबळ आहे. जिल्ह्यातील नगर परिषदेत नगराध्यक्ष सोडले तर काँग्रेस किंवा अन्य विरोधी पक्षाच्या नगरसेवकांची संख्या अधिक आहे. नगर पंचायतीत देखील बहुतांश सदस्य काँग्रेसचे आहे. जिल्हा परिषदेत काँग्रेसचे वर्चस्व आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेस सदस्यांमध्ये घट तर भाजपच्या सदस्यांमध्ये वाढ झाली, हे सत्य असले तरी विद्यमान निवडणुकीत काट्याची लढत होणार असल्याचे राजकीय वर्तुळाचे संकेत आहे. काँग्रेसचे सर्वाधिक सदस्य असताना मागील दोन ते तीन निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराने या मतदार संघातून विजय प्राप्त केल्याचा अनुभव आहे. भाजपचे सदस्य वाढल्याने काँग्रेस उमेदवाराकरीता हे विजयाचे संकेत तर नाही ना?, अशा चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे भाजपचे विद्यमान ,दस्य तथा पालकमंत्री प्रवीण पोटे यांना देखील जागा कायम ठेवण्याकरिता निवडणुकीत चांगलीच दमछाक करावी लागणार काय की कसेष हे काळच सांगणार आहे. 


भाजपचा फाॅर्म्युला भाजपवर वापरणार 
मागील अनेक वर्षांपासून भारतीय जनता पक्षाकडे असलेली विधान परिषदेची जागा भाजपच्या 'फार्म्युल्या'वर हिसकाविण्याची रणनिती काँग्रेसकडून होत असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीत तुल्यबळ अशा सक्षम उमेदवार काँग्रेसकडून दिला जाणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. 


नवीन मतदारांची मते कोणाच्या पारड्यात 
जिल्ह्यात नव्याने चार नगर पंचायतींची निर्मिती करण्यात आली. या नगर पंचायतीमध्ये असलेले सदस्य मिळून एकूण ६८ नवीन मतदारांची वाढ झाली आहे. चार ही नगर पंचायतींमध्ये बहुतांश सदस्य काँग्रेसचे अाहे. त्यामुळे वाढलेले नवीन मतदार कोणाच्या पारड्यात मते टाकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


स्थानिक संस्थेतील मतदार संख्या अशी 
जिल्हा परिषद - ५९ 
महापालिका - ८७ 
नगर परिषद - २२४ 
नगर पंचायत - ६८ 
एकूण - ४३८ 

बातम्या आणखी आहेत...