आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जादूटोण्याचा संशयावरून अमरावतीत दाम्पत्याला अटक, अंगात येणारा युवक पसार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- शहरातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची शासकीय वस्ती असलेल्या कांता नगर परिसरात एका युवकाच्या अंगात देवी येत असल्याचे सांगून ठराविक दिवशी दरबार भरायचा. या दरबारात येणाऱ्या भक्तांना देवी अंगात येणारा युवक अंगारा, फळ किंवा हळकंड तसेच अन्य साहित्य द्यायचा. हा प्रकार अंधश्रद्धा पसरवण्याचा असल्याची तक्रार अंनिसचे सचिव हरिष केदार यांनी १६ मे रोजी गाडगेनगर पोलिसात केली होती. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करून गुरूवारी (दि. १४) दाम्पत्याला अटक केली आहे. 


अनिल श्रीराम घोगंडे (५०) व त्याच्या पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे. अनिल घोंगडे यांच्या मुलाच्या अंगात नवरात्री तसेच अष्टमी,नववीला देवी येत असल्याचे सांगण्यात येत होते. यादिवशी तो मुलगा जोरजोरात आेरडून अंगात देवी आल्याचे ढोंग करत होता. दरम्यान, ज्या दिवशी त्याच्या अंगात देवी यायची, त्यादिवशी भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी व्हायची. काही राजकिय व्यक्तीसुद्धा या दरबारात येवून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 


दरम्यान कांतानगरमध्ये भरणाऱ्या या दरबाराची तक्रार काही स्थानिकांनीच अंधश्रध्दा निर्मुलन समितीकडे केली होती. त्यामुळे अंनिसचे पदाधिकारी स्वत: भक्त म्हणून जाऊन आलेत, त्यांनाही हळकंड, संत्री दिली. हा प्रकार जादू टोण्याचा व नागरिकांमध्ये अंधश्रद्धा पसरविण्याचा असल्याचे पुढे आल्यामुळे अंनिसचे सचिव केदार यांनी गाडगेनगर पोलिसांत तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी चौकशी करून गुरूवारी दोघांना अटक केली आहे. हा दरबार भरत असताना अनिल घोंगडे व त्याची पत्नी मुलाला प्रोत्साहन देत होता, असा ठपका ठेऊन पेालिसांनी त्यांना अटक केली आहे. 


तीन तलवारीही केल्या जप्त 
घोगंडे यांच्या घरातून तीन तलवार तसेच अंगारा, हळकुंड, धागेदोरे आदी साहीत्य जप्त केले आहे. तसेच एक जण पसार असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे. 
- मनीष ठाकरे, ठाणेदार, गाडगेनगर 

बातम्या आणखी आहेत...