आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजोरिया पितापुत्र, दोन अभियंत्यांवर सिंचन घोटाळाप्रकरणी गुन्हा दाखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- कळाशी येथील वघाळी नाला (ता. दर्यापूर) प्रकल्पाचे कंत्राट मिळवण्यासाठी खोटे प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी कंत्राटदार रमेशचंद्र मदनलाल बाजोरिया, संदिप रमेश बाजोरिया, सुमीत रमेशचंद्र बाजोरिया, तत्कालीन अभियंता क. सु. वेमुलकोंडा व राजेश श्रीराम सोनटक्के यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंचन घोटाळ्यात बाजोरिया यांच्यावर खामगाव व चांदूर रेल्वे पोलिस ठाण्यातही यापूर्वी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 


वघाळी नाला प्रकल्पाच्या कामाला २००८-०९ मध्ये सुरवात झाली होती. ११९ कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचे सध्या ६२ कोटी रुपयांचे काम पूर्ण झाले आहे. या कामाच्या निविदा मिळवण्यासाठी रमेशचंद्र बाजोरिया, संदिप बाजोरिया व सुमीत बाजोरिया यांनी वेमुलकोंडा व सोनटक्के यांच्याशी संगनमत करून खोटे अनुभव प्रमाणपत्र सादर करून कंत्राट मिळवले होते. 


शासनाचे उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र 
नागपूर :
अमरावती ग्रामीणच्या आर्थिक गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक उदेसिंग साळुंके यांनी सरकारच्या वतीने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र दाखल करून सिंचन घोटाळ्यावर शिक्कामोर्तब केले. गैरव्यवहार प्रकरणामध्ये ६ मार्च २०१८ रोजी चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यात तर, वाघाडी सिंचन प्रकल्पातील गैरव्यवहार प्रकरणामध्ये १० जुलै २०१८ रोजी दर्यापूर पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम १९९, १२०-बी, १९७, १९८,१९९,२००, ४२०, ४६८ आणि ४७१ अंतर्गत एफआयआर नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी उद्या, गुरुवारी न्या. भूषण धर्माधिकारी व न्या. झेड.ए. हक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...