आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदाही बीटी कपाशीवरील बोंडअळीचे संकट कायम, शेतक-यांना जास्‍त खर्च करावा लागण्‍याची भिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - बीटी कपाशीवरील बोंडअळीच्या प्रतिकार क्षमतेची कोणतीही चाचणी उपलब्ध नसल्याने या वाणात बीटी जनुके असले तरी अळीच्या प्रतिकार क्षमतेची मेख कायम आहे. त्यामुळे अळीची प्रतिकार क्षमता वाढल्यास कपाशी बोंडअळीला बळी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना देशी वाणासारख्याच फवारण्या करून खिशाला खार लावावा लागणार असल्याची भीती निर्माण झाली आहे.

 

जिल्ह्यात बीटी वाण बाजारात येण्यापूर्वी सर्रास घरच्या देशी बियाणांचा वापर केला जात होता. यात किमान शेतकऱ्यांचे बियाणाचे पैसे वाचत होते. परंतु विविध रोगांना प्रतिबंध घालण्यासाठी सध्या एवढी फारसे जालीम किटकनाशके उपलब्ध नसल्यामुळे फवारणीवरही प्रचंड खर्च करावा लागत होता. दरम्यान बीटी वाण बाजारात आल्यानंतर जिल्ह्यात कापूस उत्पादनाचा नुरच पालटून गेला. उत्पादन वाढले असले तरी उत्पन्नात मात्र फारसा फरक पडू शकला नसल्याचेही वास्तव आहे. दरम्यान, मागील वर्षी बोंडअळीच्या हैदोसामुळे यावर्षी कपाशी पेरावी किंवा नाही असा संभ्रम शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे. त्यातच बाजारात उपलब्ध असलेल्या वाणांवर बोगस बियाणांचा ठपका ठेवून कृषी विभागाच्यावतीने कारवाया करण्यात आल्याने मागील हंगामातील बियाणांमध्ये अळ्यांना प्रतिरोध करणारे बीटी जनुके होते किंवा नाही याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यावर्षी कृषी विभागाच्यावतीने बियाणे तपासणी करण्यात येत असून त्यात फक्त बीटी जनुके आहे किंवा नाही हे तपासण्यात येत आहे. परंतु अळ्यांना प्रतिरोध करणारे जनुके असतानाही अळ्यांची जर प्रतिकारशक्ती वाढली किंवा नाही याबाबत मात्र कुणीच खात्रीने सांगू शकत नसल्याने कपाशीवर बोंडअळीची टांगती तलवार कायम आहे.

 

फळधारणेच्यावेळीच अळीचा बोंडात प्रवेश
बीटी वाणावर येणारी गुलाबी बोंडअळी फुल गळल्यानंतर फळधारणेच्या अवस्थेत बोंडात प्रवेश करते असे कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे. परंतु मागील पंधरा-वीस वर्षांपासून बीटी कपाशीवर बोंडअळीच न आल्याने शेतकरी गाफील राहीला. परंतु आता मात्र बोंडअळीची प्रतिकार क्षमता वाढली असल्याने बीटी वाणातील जनुके काही कालावधीपर्यंत गुणकारी ठरत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे कपाशीचे वाण बीटी जनुकाचे जरी असले तरी विशिष्ट कालावधीनंतर मात्र बोंडअळी सक्रीय होईल किंवा नाही याबद्दल मात्र विश्वासार्हता नसल्यामुळे बोंडअळीचे संकट यावर्षीही कायम राहणार आहे.

 

शेतकऱ्यांचा यंदा फवारणीचा खर्च वाढणार
बीटी वाणावरील बोंडअळीच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना साधारणत: महिनाभरातच पाते धरण्याच्या अवस्थेपासून फवारणीसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे अळ्यांच्या नियंत्रणासाठी कमालीचा आर्थिक झटका सहन करावा लागणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यानंतर संभाव्य उत्पादन व बाजारभावही अनिश्चित असल्यामुळे कपाशीचे बीटी वाण शेतकऱ्यांसाठी बेभरवशाचे ठरणार असल्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता शेतकरी चिंतेत पडला आहे.

 

शेतकऱ्यांचा यंदा फवारणीचा खर्च वाढणार
बीटी वाणावरील बोंडअळीच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना साधारणत: महिनाभरातच पाते धरण्याच्या अवस्थेपासून फवारणीसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे अळ्यांच्या नियंत्रणासाठी कमालीचा आर्थिक झटका सहन करावा लागणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यानंतर संभाव्य उत्पादन व बाजारभावही अनिश्चित असल्यामुळे कपाशीचे बीटी वाण शेतकऱ्यांसाठी बेभरवशाचे ठरणार असल्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता शेतकरी चिंतेत पडला आहे.

 

अळीच अजब : देशी वाणांवर पडणाऱ्या अळ्या या बोंडात वरून घुसत असत. त्यामुळे बोंडाला छिद्र दिसून येत असे. परंतु बीटी वाणाच्या कपाशीला भरमसाठ टवटवीत बोंडे दिसून येत होती. कोणतेही छिद्र दिसत नसल्याने शेतकरी भ्रमात राहीला. वरून बोंड चांगले दिसत असताना आतून अळ्या असेल याची कल्पनाच नसल्याने शेकऱ्यांना त्याचा बंदोबस्तही करता आला नाही.

 

बियाण्यांची तपासणी
बीटी बियाणातील जनुके तपासणी सध्या सुरू आहे. क्राय-१ व क्राय-२ या जनुकांची तपासणी करण्यात येत आहे. परंतु गुलाबी बोंडअळ्यांची प्रतिकार क्षमतेबाबत अनिश्चितता आहे.
- अनिल खर्चान, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,अमरावती

 

बातम्या आणखी आहेत...