आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nagpur
  • सासु सुनेचा विजेचा शॉक लागून मृत्‍यू, Death Of The Mother in law And Daughter In Law Due To Lightning Shock

सासु-सुनेचा विजेचा शॉक लागून मृत्‍यू, तारेवरील वाळत घातलेले कपडे काढताना दुर्घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ- जिल्ह्यातील मारेगांव तालुक्यातील कुंभा येथे विजेचा शॉक लागुन सासु-सुनेचा मृत्यु झाल्याची घटना आज सकाळी सात वाजेच्‍या दरम्यान घडली. सुनिता मोहुर्ले आणि शकुंतला मोहुर्ले असे या महिलांचे नाव आहे.

 

घरासमोर बांधलेल्‍या तारेवरील वाळत घातलेले कपडे काढण्‍यासाठी सुनीता आज सकाळी गेल्‍या होत्‍या. यावेळी तारेत विद्युत प्रवाह असल्याने त्‍यांना जोराचा धक्का लागला. त्‍यांना वाचवण्‍यासाठी सासु शकुंतला गेल्‍या असता त्यांनाही विजेचा शॉक लागला. या दोघांना वणी ग्रामीण रुग्णालयात तातडीने नेण्यात आले. मात्र रुग्णालयात दाखल करण्याच्या आधीच दोघींचा मृत्यू झाला. या घटनेमुळे कुंभा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

बातम्या आणखी आहेत...