आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जासाठी पुन्हा एका शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी; सोसायटी सचिवाविरोधात तक्रार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दारव्हा- शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय सुरू करण्याकरिता बँकेकडून पाच लाख रुपये कर्ज मिळवून देतो, असे सांगत सोसायटीच्या सचिवाने शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीर सुखाची मागणी केली. हा खळबळजनक प्रकार दारव्हा तालुक्यातील नायगाव येथील पीडितेने सोमवार, २ जुलै रोजी पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून उघडकीस आला. 


नायगाव येथील एका शेतकऱ्याकडे चार एकर शेती आहे. मात्र, फारसे उत्पन्न नसल्याने शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय सुरू करण्याचा विचार शेतकरी आणि त्याच्या पत्नीने केला होता. पीडित महिलेने मावशीकडून कर्जासंदर्भात माहिती घेतली. नायगाव ग्राम विविध सहकारी सोसायटीचे सचिव दादाराव इंगोले हे कर्ज मिळवून देतील, असे कळाले. पीडितेने इंगोले यांची भेट घेऊन दुग्ध व्यवसायाकरिता पाच लाख रुपये कर्जाची मागणी केली. त्यांनी कर्ज काढून देण्यास होकार दर्शवला. 


यानंतर पीडितेने कागदपत्रे दिली. सहा महिने लोटूनही कर्ज उपलब्ध झालेच नाही. महिलेने इंगोले यांना विचारणा केली. त्यावर इंगोले यांनी महिलेकडे थेट शरीर सुखाची मागणी केली. वारंवार फोन करून हट्ट केला असता, महिलेने ही बाब कुटुंबीयांना सांगितली. सोबतच इंगोले यांचे फोनवरील संभाषण रेकॉर्ड केले. त्यानंतर थेट दारव्हा पोलिस ठाणे गाठून दादाराव इंगोले यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. दिलेल्या तक्रारीवरून दारव्हा पोलिसांनी ३५४ (अ)(५) कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. 

बातम्या आणखी आहेत...