आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळ्यात उपचारांच्या बदल्यात शरीरसुखाची मागणी, आमदार गोटे यांचा धक्‍कादायक आरोप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - धुळे येथील भाऊसाहेब हिरे सरकारी रुग्णालयात रुग्ण महिलेवर उपचारासाठी तिची नातेवाईक असलेल्या महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली गेली, तर एका रुग्ण महिलेच्या पतीला साफसफाईचे काम करण्यास भाग पाडण्यात आल्याचा धक्कादायक आरोप आमदार अनिल गोटे यांनी बुधवारी विधानसभेत केला. हा प्रकार अतिशय गंभीर असून शासनाने कडक कारवाई करावी, असे निर्देश विधानसभाध्यक्षांनी यावेळी दिले.

 

आमदार गोटे यांनी बुधवारी पॉइंट अॉफ इन्फर्मेशनच्या माध्यमातून हा विषय उपस्थित केला. ते म्हणाले. धुळ्यातील भाऊसाहेब हिरे सरकारी रुग्णालयात औषधांच्या बदल्यात एका नातेवाईक महिलेकडे कर्मचाऱ्याने शरीरसुखाची मागणी केली असून या प्रकरणी कारवाई करावी. त्याचप्रमाणे रक्ताच्या बाटल्या व उपचारासाठी रुग्ण महिलेच्या पतीला रुग्णालयात साफसफाई व अन्य कामे करण्यास भाग पाडण्यात आल्याचाही प्रकार घडला. हे अतिशय गंभीर प्रकार असून मानवतेला काळिमा फासणारे आहेत, असे सांगत संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली. या गंभीर मुद्द्यावर विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी कडक कारवाई करण्याचे निर्देश राज्य शासनाला दिले.

 

बातम्या आणखी आहेत...