आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नास नकार; सोहोलीमध्ये तरुणीची भररस्त्यावर हत्या, नागपूर जिल्ह्यातील घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- लग्नास नकार दिल्याने सुडाच्या भावनेने पेटलेल्या तरुणाने एका तरुणीची भररस्त्यात चाकूने वार करून हत्या केली. दिवसाढवळ्या हा हल्ला करून मारेकरी तरुण पसार झाला.


पारशिवनी तालुक्यात सिंगोरी येथील रत्नमाला राजकुमार रांगणकर (२२) हिला प्रकल्पग्रस्त म्हणून वेस्टर्न कोल फील्ड्सच्या चनकापूर कार्यालयात नोकरी मिळाली होती. यादरम्यान, मंगल ऊर्फ साजन बागडे (२५) रत्नमालाशी विवाह करू इच्छित होता. मात्र, रत्नमालाच्या घरच्यांचा विरोध होता. मंगल सतत रत्नमालास हटकत असल्याने रांगणकर कुटुंबाने १६ फेब्रुवारीला मंगलविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली होती. त्याच दिवशी सिंगोरी गावात मंगलला काही तरुणांनी मारहाण केली. दरम्यान, शनिवारी सकाळी साडेदहाच्या दरम्यान मंगल साहोली गावातील चौकात दबा धरून बसला. रत्नमाला व तिची आई दुचाकीने चनकापूरला जात असताना मंगलने  तिच्यावर सळईने वार केला.  ती गाडीवरून पडल्यावर चाकूने वार केले व तो पसार झाला. गावकऱ्यांनी जखमी रत्नमालास कामठी येथील रुग्णालयात दाखल केले. दुपारी डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. 

 

४ वर्षांपूर्वी प्रियंकाची हत्या
चार वर्षांपूर्वी याच गावातील प्रियंका रांगणकर या तरुणीची प्रेमप्रकरणातून याच पद्धतीने हत्या झाली होती. दोघीही नातेवाईकच होत्या, असे गावातील लोकांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...