आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी प्रश्नावरून पंडित-धस यांच्यात जुंपली; परिषदेत वाचला बीड जिल्हा बँकेतील घाेटाळ्यांचा पाढा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- शेतकरी कर्जमाफी व इतर विषयांवर नियम २६० अन्वये विधान परिषदेत बुधवारी झालेल्या चर्चेत बीड जिल्ह्यातील अामदार सुरेश धस व अामदार अमरसिंह पंडित यांच्यात जाेरदार खडाजंगी झाली. राष्ट्रवादीचे अामदार पंडित यांनी सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले, तर नुकतेच राष्ट्रवादीतून भाजपत येत अामदारकी मिळवलेल्या धस यांनी त्यांना सडेताेड उत्तरे देत पंडितांनी बीड जिल्हा बँकेत केलेल्या भ्रष्टाचाराचा पाढाच वाचला. दाेघांनीही वैयक्तिक वादावर येत एकमेकांवर अागपाखड केल्यामुळे वातावरण चांगलेच तापले हाेते. दरम्यान, कामकाज संपल्यानंतर सभागृहाबाहेरही हे दाेन्ही अामदार एकमेकांना ‘अरे-तुरे’ची भाषा वापरताना दिसले.  

 

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विराेधकांनी फडणवीस सरकारवर टीकेची झाेड उठवली हाेती. अमरसिंह पंडित, रामहरी रूपनवर, सुनील तटकरे यांच्या भाषणानंतर उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी सत्ताधारी बाकावरील सुरेश धस यांना बोलण्याची संधी दिली. धस यांनी पंडित यांच्या अाराेपांचा समाचार घेताना त्यांनी बीड जिल्हा बँकेत केलेल्या गैरव्यवहाराचा व शेतकऱ्यांच्या त्यांच्याकडील थकबाकीचा पाढा वाचला. पंडितांच्या जयभवानी सहकारी साखर कारखान्याकडे ४५ कोटींची, माउली सूतगिरणीकडे ८० लाखांची, शनिदेव पतसंस्थेकडे ९० लाखांची थकबाकी असल्याचे सांगितले. त्यावर पंडित संतप्त झाले. ‘धस हे वैयक्तिक द्वेषापाेटी अाराेप करत अाहेत. विषयाला धरून बाेलण्याची सभापतींनी त्यांना सूचना द्यावी’ अशी मागणी करतानाच, उद्या मीही कोणाकडे किती थकबाकी आहे, याची माहिती देईन, असे प्रतिअाव्हान दिले.


चंद्रकांत दादांकडून पाठराखण
धस यांच्या वक्तव्यावर विराेधी बाकावरील अामदारांनी अाक्षेप घेणे सुरू केले, त्याच वेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांची पाठराखण केली. ‘धस विषयाला धरूनच बोलत आहेत. शेतकऱ्यांची आजची वाईट अवस्था कोणी केली हे कळायचे असेल तर आकडेवारी द्यावीच लागेल’, असे त्यांनी विराेधकांना ठणकावले.  ‘करून करून भागले आणि देवपूजेला लागले’, असा टोला लगावतानाच ‘एक अधिवेशन असेही होऊ द्या, ज्यात या महाराष्ट्राची वाट कोणी लावली हे कळेल’ असे अाव्हान विराेधकांना उद्देशून दिले. दरम्यान, या गाेंधळामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावरील चर्चा ‘अाॅन लेग’ ठेवण्यात अाली. 

बातम्या आणखी आहेत...