आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरू होण्याआधीच नागपूर मेट्रोची 80 कोटींची कमाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- देशात सरकारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नेहमीच तोट्यात चालते, असा सार्वत्रिक अनुभव आहे.  यापासून धडा घेत नागपूर मेट्रोने आपले उत्पन्न वाढवण्यावर चांगलाच भर दिलाय. नागपूर मेट्रोने सुरू होण्यापूर्वीच ८० कोटींची घसघशीत कमाई केल्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी दिली. येत्या काळात नॉनफेअर रेव्हेन्यूमधून ५० % उत्पन्न होईल, असे मेट्रो प्रशासनाचे प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.  


नॉनफेअर रिव्हेन्यूमधून ही कमाई करण्यात आली असून नागपूर मेट्रोची प्रवासी वाहतूक लवकरच सुरू होणार अाहे. मेट्रो ताशी ९० किमी इतक्या वेगाने धावणार आहे. त्यानंतर तिकिटाच्या पैशातून तर उत्पन्न मिळणारच आहे, पण त्याआधीच वेगवेगळे उत्पन्नाचे स्रोत शोधून त्यातून नागपूर मेट्रोने आपली कमाई सुरू केली अाहे.