आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाभुळगावात शेतकऱ्याची आत्महत्या, कर्जबाजारीपणाला कंटाळून केले विषप्राशन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाभुळगाव- तालुक्यातील गोंधळी (किन्ही) येथील शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून सोमवारी विष प्राशन करून आत्महत्या केली. सुधाकर बकरात उईके वय ५२, असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. 


सुधाकर उईके सकाळपासून घरी आले नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला असता, गावा शेजारील शेख बब्बू यांच्या शेतात मृतावस्थेत आढळून आले. त्यांच्यावर बँकेचे कर्ज होते. या घटनेची फिर्याद पवन सुधाकर उईके याने बाभुळगाव पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. पुढील तपास बाभुळगाव पोलिस करत आहे. 

बातम्या आणखी आहेत...