आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरूणीची कंबर पकडून तिला खाली पाडले, भररस्त्यावर तरूणाने केले असे कृत्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गडचिरोली- आई व मैत्रीणीसोबत बँकेत जात असलेल्या अल्पयीन मुलीचा शेजारील तरूणाने विनयभंग केल्याची घटाना २८ डिसेंबर २०१७ रोजी घडली होती. या प्रकरणी आरोपी तरूणाला गडचिरोली विशेष सत्र न्यायालयाने 5 वर्षांचा सश्रम कारावास व 3 हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.


सविस्तर माहिती अशी की, पीडित मुलगी २८ डिसेंबर २०१७ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास आई व मैत्रीणीसोबत बँकेत आधार लिंक करण्याकसाठी जात होती. तेव्हा घराशेजारी राहणाऱ्या संजय सोमा मेश्राम याने पीडित मुलीची मान व कंबर पकडून तिला खाली पाडले. तिच्या आईने तिची सुटका करण्याचा प्रयत्न केला परंतु, आरोपीने तिला देखील धक्का देऊन खाली पाडले. पीडित मुलीच्या आईने याबाबतची तक्रार गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली. त्यावरून गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणी न्यायालयाने २७ एप्रिल रोजी निकाल देताना आरोपीला पाच वर्षांचा सश्रम कारावास व एक हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. 

बातम्या आणखी आहेत...