आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​पैसे देतो म्हणून बोलवून घेतले अन् परराज्यात नेऊन जबरदस्ती लावले तरूणीचे लग्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ- शहरातील पिंपळगाव परिसरातील बालाजी पार्क येथे राहणाऱ्या एका २१ वर्षीय तरुणीचा अहमदाबाद येथे जबरीने विवाह लावण्यात आला. हा प्रकार दि. १४ एप्रिल रोजी उघडकीस आला असून सदर तरूणीने याबाबत लोहारा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. दि. ४ एप्रिल रोजी पिंपळगावातील सदर तरुणीला नेर येथील लता मोरे, शेबीर पठाण आणि एका साथीदारांनी संगणमत करून पैसे देण्याच्या कारणावरून नेर येथे बोलाविले. त्यानंतर तीची फसवणूक करून तीला अहमदाबाद येथे नेण्यात आले. दरम्यान तरूणीच्या इच्छेविरूध्द दमदाटी करून तीच्या मनाविरूध्द हार घालून विवाह केला. या प्रकरणी पोलिसांनी लता मोरे, शेबीर पठाण, एका साथीदारांविरूध्द गुन्हे नोंद केले.
बातम्या आणखी आहेत...