आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनैतिक संबंधातून मित्रानेच मित्राला संपवले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - परसोडा शिवारातील एका विहिरीत राजेश जनार्दन गावंडे (२८) या युवकाचा मृतदेह शुक्रवारी दुपारी आढळला होता. दरम्यान, शुक्रवारी उशिरा रात्री फ्रेजरपुरा पोलिसांनी राजेशच्या मित्राला त्याच्या खून प्रकरणात अटक केली. अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याची बाब पोलिसांच्या तपासात पुढे येत आहे.

 

संजय भीमराव वंजारी (२८, रा. मासोद) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. संजय व राजेंद्र हे दोघे मित्र १३ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता दारू प्यायला गेले होते. तेव्हा संजयने राजेंद्रच्या डोक्यावर मागून दगड मारला. यात तो बेशुद्ध झाला. विहिरीत त्याने राजेंद्रला दोराचे साहाय्याने विहिरीत सोडले. दरम्यान, पोलिसांनी संजयला अटक केली. त्याला न्यायालयापुढे हजर केले असता, २३ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

बातम्या आणखी आहेत...