आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Gadchiroli: कार-काळीपिवळीची समाेरासमोर धडक, सात जण ठार; दाेन्ही वाहने अक्षरश: चक्काचूर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- गडचिराेली जिल्ह्यातील आलापल्ली-सिरोंचा मार्गावरील जिमलगट्टाजवळील गोविंदगाव येथे कार आणि काळीपिवळी टॅक्सीत रविवारी सकाळी भीषण धडक होऊन दोन चिमुकल्यांसह एकूण सात जण जागीच ठार झाले. तर ५ जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये वाहनचालकाचा समावेश अाहे.

 
गडचिरोली जिल्ह्यात जिमलगट्टापासून सुमारे ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या गोविंदगाव येथील बस थांब्याजवळ सकाळी साडेआठ ते नऊच्या सुमारास हा अपघात घडला. चंद्रपूरमधील बंगाली कँप येथील रहिवशी असलेले मित्तलवार कुटुंब बलेनो कारने प्रसिद्ध कालेश्वर मंदिरात देवदर्शनासाठी जात होते. त्यांच्या कुटुंबातील प्रमुखासह ५ जण या अपघातात ठार झाले आहेत. तर सिरोंचा येथून देवराव मोहुर्ले यांची बदली झाल्याने त्यांचे कुटुंब घरसामानासह काळीपिवळी टॅक्सीने मुरखडा येथे येत होते. काळीपिवळीतील निखिल देवराव मोहुर्ले (२५) आणि चालक संदीप आनंदराव गडप (४०) यांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला. 


या भीषण अपघातात कारमधील सीमा कमल मित्तलवार, अर्चना संदीप मित्तलवार, त्रिशा सुधीर अक्केवार, प्रतिमा देवराव मोहुर्ले आणि देवराव सखाराम मोहुर्ले हे जखमी आहेत. जखमींना सुरुवातीला अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात अाले हाेते. मात्र नंतर डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. 


५ एकाच कुटुंबातील 
अपघातात ठार झालेल्यांत मारूती मित्तलवार, त्यांची पत्नी लता, मुलगा कमल, नात श्रीनिता आणि नातू सरस हे एकाच कुटुंबातील आहेत. तर, काळीपिवळीतील निखिल देवराव मोहुर्ले आणि चालक आनंदराव गडप हेसुद्धा मृत्यूमुखी पडले. 

बातम्या आणखी आहेत...