आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नक्षल्यांशी आजवर झालेली प्रत्येक लढाई बावनकशी, बनावट चकमकींची गरज नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- १९८० पासून गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद सुरू झाला तेव्हापासून उडालेल्या चकमकीत अपवाद वगळता पोलिसच शहीद होत. मात्र, आठवडाभरापूर्वी झालेल्या जोरदार कारवाईमुळे हे चित्र आता बदलले आहे. अशा कारवायांत २१६ पोलिस शहीद झाले, तर २३३ नक्षलवादी ठार झाले.

 

नक्षलवादाशी लढणाऱ्या पोलिसांच्या शौर्याचे कौतुक करताना गडचिरोली परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे यांनी ‘सी-६०’च्या कारवाईबद्दलही अभिमानाने माहिती दिली. दिव्य मराठीशी बोलताना शिंदे म्हणाले, ‘आमची प्रत्येक लढाई बावनकशी खरी आहे. बनावट चकमकींची गरज आम्हाला नाही.’


शिंदे यांनी सांगितले, “सी-६०’ कमांडोनी केलेल्या धडाकेबाज कारवाईत ३९ नक्षलवादी मारले गेले. त्यानंतर माओवाद्यांच्या शहरी समर्थकांनी बिनबुडाचे आरोप सुरू केले. नक्षल्यांना विष देऊन मारले, ते लग्नासाठी आले होते. त्यांना बेसावध मारले असे आरोप होत आहेत. प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी आहे. नक्षलवादी निष्पाप आदिवासींना गोळ्या घालतात.

 

त्या वेळी हे लोक मूग गिळून बसतात. आमची प्रत्येक कारवाई खरी असते. बनावट चकमकींची गरज आम्हाला नाही. आमच्यासाठी अगोदर आदिवासींची सुरक्षितता महत्त्वाची आहे. आम्ही पदक आणि पदोन्नतीसाठी काम करत नाही. “सी-६०’ पथकाने केलेली कारवाई पोलिसांचे मनोबल उंचावणारी आहे. व्यावसायिकता, शारीरिक तंदुरुस्ती, मोहिमेची आखणी आणि अचूक कारवाई अशा सर्वच आघाड्यांवर “सी-६०’ पथक यशस्वी ठरले. पथकाचे मनोबल उंचावण्यासाठी पार्टी कमांडरला महत्त्व दिले. त्याचा सकारात्मक परिणाम झाल्याचे शिंदे यांनी सांगितले.


मानसन्मान आणि सांघिक खेळ : सर्वोच्च पदापासून चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांपर्यंत प्रत्येकाला आत्मसन्मान आणि प्रतिष्ठा असते. मोठ्यांना या गोष्टी अधिकार आणि पदामुळे मिळतात. पण अनेकदा कनिष्ठ कर्मचाऱ्यांचा कोणी विचार करत नाही. आम्ही नेमका या गोष्टीवर भर दिला. शिपायापासून प्रत्येकाचा वैयक्तिक मानसन्मान आणि प्रतिष्ठा जपल्यामुळे त्यांच्यात उत्साह संचारला. त्यामुळे धडक कारवाई झाली, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.


असे आहेत नक्षल दलम : दक्षिण गडचिरोलीमध्ये १० कंपन्या, १४ व ७ फलटन तसेच सिरोंचा, अहेरी, पेरीमीली, गट्टा व भामरागड हे दलम कार्यरत अाहे. उत्तर गडचिरोलीमध्ये ४ कंपन्या, १५ व ०३ फलटन, तसेच कसनसूर, चातगाव, टिप्पागड, कोरची, कुरखेडा व देवरी हे दलम कार्यरत आहे. तर गोंदिया जिल्ह्यात गोंदिया, राजनांदगाव व बालाघाट म्हणजे जीआरबी विस्तार डिव्हिजन, फलटन ५५, विस्तार फलटन १ व २, तसेच दरेकसा, तांडा, मलाजखंड हे दलम आहे. यातील दरेकसा व तांडा दलम मध्य प्रदेशाच्या सीमेवर आहे. एक फलटन (प्लॅटून) व कंपनीत  ३० व दलममध्ये २० सदस्य असतात.


महिला नक्षलवादी कमांडरचे आत्मसमर्पण
कुख्यात नक्षलवादी आणि तेलंगणा राज्यात सक्रिय मंगी दलमची उप कमांडर ज्योती उर्फ रविना जोगा पुडयामी (२६)हिने सोमवारी   गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. ज्योतीवर एकूण ४ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. ती नोव्हेंबर २००९ मध्ये छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या गटात सहभागी झाली होती.

 

बातम्या आणखी आहेत...