आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेला शिवीगाळ; मारहाण करुन विनयभंग, शासकीय कर्मचाऱ्यावर गुन्हा झाला दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ - पाळीव कुत्री घरात कशी घुसली या कारणावरुन संतप्त झालेल्या एका शासकीय कर्मचाऱ्याने घराच्या शेजारी राहणाऱ्या महिलेला मारहाण, ओढताण करुन तीचा विनयभंग केला. ही घटना शुक्रवारी टिळकवाडी परिसरात घडली. नरेंद्र लांजेवार वय ५२ वर्षे रा. टिळकवाडी असे गुन्हा दाखल झालेल्या त्या शासकीय कर्मचाऱ्याचे नाव असून तो कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत आहे.

 

पीडीत महिलेच्या घराशेजारी त्यांचे सासरे राहतात. त्यांच्या घरी असलेली पाळीव कुत्री त्यांच्या घराच्या शेतारी राहणाऱ्या लांजेवार यांच्या अंगणात शिरली. या कारणावरुन चिडून लांजेवार हातात काठी घेऊन शिवीगाळ करीत पीडीत महिलेच्या सासऱ्याला मारहाण करण्यासाठी धावून आला. यावेळी पीडीत महिला भांडण सोडविण्यासाठी गेल्या असता लांजेवार यांनी त्याना शिवीगाळ करुन ओढताण केली. त्यात त्यांच्या अंगावरील गाऊन फाटला. त्यानंतर त्या महिलेला मारहाण केली. यावेळी अन्य दोघे लांजेवार यांच्यासोबत होते अशा तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला.

बातम्या आणखी आहेत...