आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतनही आता थेट त्यांच्या बँक खात्यात : पंकजा मुंडे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या शिष्टमंडळाने बुधवारी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची विधान भवनातील दालनात भेट घेतली. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना विलंबाने वेतन मिळत होते. ते आता आॅनलाइन करून थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याने त्यांना आता वेळेत वेतन मिळणे शक्य होणार असल्याचे मुंडे यांनी या वेळी सांगितले. 


ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना त्यांच्या पात्रतेनुसार वर्ग तीन आणि वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांइतके वेतन देण्याच्या उद्देशाने रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली शासनाने नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल लवकरच मागवण्यात येईल. त्यानुसार कार्यवाही केली जाईल. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे पेन्शन, राहणीमान भत्ता, भविष्य निर्वाह निधीचा नियमित भरणा, आकृतिबंधात सुधारणा अशा विविध मागण्यांसाठी सरकार सकारात्मक विचार करीत असल्याचे मुंडे यांनी या वेळी सांगितले. 


वेतनवाढ व इतर प्रलंबित मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वतीने बुधवारी नागपूर विधानभवनावर माेर्चा काढण्यात अाला. 

बातम्या आणखी आहेत...