आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुलाबी बोंडअळीचे सर्व्हेक्षण; केंद्रीय पथक विदर्भात दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- २०१७ च्या खरीप हंगामामध्ये राज्यात गुलाबी बोंडअळीमुळे कापसाचे तसेच तुडतुडे किडीच्या प्रादुर्भावामुळे धान पिकाचे नुकसान झाले. यामध्ये नागपूर विभागात म्हणजेच पूर्व विदर्भात एकूण १० लाख ९३ हजार ९६८ एकरावरील (४,३७,५८७.२६ हेक्टर) कापूस पिकाचे नुकसान झाले. या नुकसानीचा सर्व्हे करण्यासाठी केंद्रीय चमू विदर्भात आली असून बुधवार १६ मे रोजी या चमूने वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्याचा दौरा केला. तर उद्या गुरुवार १७ रोजी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचा दौरा करणार आहे. या चमूमध्ये कोइम्बतूर येथील प्रादेशिक कापूस संशोधन केंद्राचे प्रकल्प समन्वयक डाॅ. ए. एच. प्रकाश, हैदराबाद येथील भारतीय भात संशोधन केंद्राचे संचालक डाॅ. एस. आर. होलेती, नीती आयोगाचे डाॅ. बी. गणेशराम, डीसीडी, नागपूरचे संचालक डाॅ. आर. पी. सिंग, एक्स्पेंडिचर विभाग, दिल्लीचे दीना नाथ यांच्यासह ओमप्रकाश सुमन, डाॅ. तरूण कुमार सिंग आदी अधिकारी आहेत. 

 

या प्रकरणी शासनाने २३ फेब्रुवारी रोजी शासन निर्णय काढून बाधित शेतकऱ्यांना मदत जाहीर केली. कोरडवाहू क्षेत्रासाठी दोन हेक्टरपर्यंत हेक्टरी ६,८०० प्रति हेक्टर आणि बागायती शेतीसाठी १३,५०० प्रति हेक्टरी मदत जाहीर करण्यात आली. दोन सेक्टरपेक्षा अधिक शेती असलेल्या शेतकऱ्यांनाही दोन हेक्टरपर्यंत ही मदत देण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा मिळाला. नागपूर विभागात वर्धा जिल्ह्यात २५३२६०.३८ हेक्टरवर पेरणी करण्यात आली. नागपूर जिल्ह्यात २३९१३५.१५ हेक्टर, भंडारा ११०२ हेक्टर, चंद्रपूर जिल्ह्यात १८२७७४ हेक्टर आणि गडचिरोली जिल्ह्यात ११६५७.२० हेक्टर अशी एकूण विभागात ६८७९२८.७३ हेक्टरवर पेरणी करण्यात आली. विभागात वर्धा जिल्ह्यात २,१०,३४५ शेतकरी, नागपूर जिल्ह्यात १,१०,३५७ शेतकरी, चंद्रपूर जिल्ह्यात १,५४,२२६, गडचिरोली जिल्ह्यांत ९१२ असे एकूण ४,७५,८४० शेतकऱ्यांचे नुकसान झाले. 

बातम्या आणखी आहेत...