आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंचन घोटाळा आरोपपत्रांवर ३ महिन्यांत सुनावणी पूर्ण करा : खंडपीठ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- विदर्भातील सिंचन घोटाळ्यांसंदर्भात दाखल आरोपपत्रांवर विशेष न्यायालयात ३ महिन्यांत सुनावणी पूर्ण करावी, त्यासाठी दैनंदिन सुनावणी घ्यावी, अधिकाऱ्यांवर आरोपपत्र दाखल करण्यासाठी एसीबीच्या प्रलंबित प्रस्तावांवर राज्य शासनाने आठवडाभरात निर्णय घ्यावा, असे स्पष्ट आदेश देताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी विशेष तपास पथकांच्या तपासातील मंदगतीवर पुन्हा तीव्र नापसंती व्यक्त केली. 


विदर्भातील ४३ प्रकल्पांच्या चौकशीत मोठ्या प्रमाणात दस्तएेवजांचा समावेश असल्याने या चौकशीस किमान सहा महिने लागतील, असे सरकारच्या वतीने गुरुवारी प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून न्यायालयात सांगण्यात आले. न्या. भूषण धर्माधिकारी आणि न्या. झेड.ए. हक यांच्या खंडपीठाने एकूणच तपासाच्या गतीवर तीव्र नापसंती व्यक्त करताना विशेष तपास पथकाकडून दिली जाणारी कारणे संयुक्तिक नाहीत. प्रामाणिकपणे तपास होत नाही, या शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...