आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तासभराच्या दमदार पावसाने अमरावतीकरांची दाणादाण!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - तासभर झालेल्या दमदार पावसाने अमरावतीकरांची ७ जुलैला चांगलीच दाणादाण उडाली. शहराच्या अनेक भागात पाणी शिरले, तीन ठिकाणी झाडे कोसळली तर रस्त्यावर पाणी साचले होते. गत तीन चार दिवसांपासून सुरू असलेल्या मध्यम पावसाने आज दुपारी १ वाजता दमदार हजेरी लावली. तासभर मुसळधार झालेल्या पावसाने नागरिकांची मात्र चांगलीच दाणादाण उडाली. जोरदार पाऊस बसरल्याने पाणी तुंबल्या होत्या. त्यामुळे बराच वेळ रस्त्यावर पावसाचे पाणी साचले होते. सखोल भागात पाणी साचल्याने नागरिकांना असुविधेचा सामना करावा लागला. रेल्वे स्टेशन ते बसस्थानक मार्गावर सिमेंट रस्त्याचे बांधकाम करण्यात आले. त्यामुळे रेल्वे स्टेशन चौकात असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सखोल भागात असलेल्या कार्यालयात मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले. पाण्याचा निचरा होण्यास मार्ग नसल्याने अखेर महापालिकेच्या आणीबाणी केंद्राची मदत घेण्यात आली. नाली-नाले तुडूंब भरुन वाहत असल्याने पाणी जाण्यास मार्गच नसल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले हाेते. जोरदार पावसामुळे शेगाव नाका परिसरातील गजानन महाराज मंदिराजवळ झाड पडले. राठी नगरातील पवन मेडीकल तसेच रामपुरी कॅम्प परिसरातील रामलक्ष्मण संकुल येथे देखील झाड पडल्याची घटना घडली. मनपाच्या आणीबाणी केंद्राकडून झाडे हटविण्याचे काम करण्यात आले.

 

तुरळक पावसाचा पिकांना फायदा : जिल्ह्यात सुरु असलेल्या तुरळक पावसामुळे पिकांना फायदा झाला अाहे. परंतु अद्यापही जिल्ह्यात दमदार पावसाची अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात सुमारे ८० टक्क्याच्यावर पेरण्या आटोपल्या आहेत. पावसामुळे सद्यस्थितीत पिकांची अवस्था समाधानकारक असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात सोयाबीन, मुग, कपाशी, उडीद, तूर या प्रमुख पिकांच्या पेरण्या आटोपण्याच्या मार्गावर अाहे. परंतु विहिरींच्या खालावलेल्या पातळ्या, धरणातील घटलेली पाण्याची पातळी भरून काढण्यासाठी अद्यापही दमदार पावसाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


२१२.६ टक्के पाऊस
अमरावती जिल्ह्यात १ जून ते ६ जुलै २०१८ दरम्यान प्रत्यक्ष २१२.६ टक्के पर्जन्यमान झाले. १ जून ते ७ जुलै दरम्यान एकूण २२६ मिलीमीटर पर्जन्यमान झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. प्रत्यक्ष पर्जन्यमानाची टक्केवारी १०८.५ आहे. यामुळे सध्या टंचाई काहीअंशी दूर होईल.

बातम्या आणखी आहेत...