आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मुंबई-नागपूर दरम्यान हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर'; केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- मुंबई ते नागपूरदरम्यान बांधल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गालगतच रेलवे मंत्रालयाचया पुढाकाराने रेलवे लाइन टाकण्याचा प्रस्ताव विचाराधीन असून हा ‘हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर’  झाल्यास नागपूर ते मुंबई हे अंतर केवळ ५ तासांत पार करता येईल, असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी नागपूरात केले. 


सुरेश भट सभागृहात भारतीय रेल्वे व महामेट्रो, महाराष्ट्र शासन यांच्यात  ‘महामेट्रो-फिडर ट्रेन्स’ प्रकल्पाच्या  सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्याच्या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांच्यासह पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भारतीय रेल्वे मंडळाचे अधयक्ष अश्वनी लोहानी व केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाचे सचिव मिश्रा प्रामुख्याने उपस्थित होते.   

  
‘मास रॅपिड ट्रान्झिट सिस्टिम’ (एमआरटीएस) अंतर्गत नागपूर शहराला वर्धा, भंडारा या ‘सॅटेलाइट सिटी’ना मेट्रो नेटवर्कमार्फत जोडून या शहरातील प्रवाशांना मेट्रो रेल्वे प्रवासाचा जलद अनुभव देणे हा या सामंजस्य कराराचा उद्देश असल्याचे गोयल यांनी सांगितले. भारतीय रेल्वेने मुंबईच्या उपनगरीय वाहतुकीमधये सुधारणांसाठी ६७ हजार कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. रेल्वेच्या विद्युतीकरणावर प्राधान्य दिले जात असून रेल्वे विद्युतीकरणामूळे इंधनावर होणारा १२ ते १५ हजार कोटींचा खर्च वाचू शकतो. नागपूरमधये ई-वाहने (इलेक्ट्रिकवर चालणारी वाहने) ई-बस व ई-टॅकसीच्या माधयमातून चालू झाली असून नागपूरचा हा प्रकलप देशाकरिता पथदर्शी ठरेल, अशी आशाही गोयल यांनी व्यक्त केली.  


इलेक्ट्रिक परिवहन व्यवस्था सक्षम उपाय  
वाढत्या वाहनांचया संखयेमुळे महानगरातील प्रदूषणाची समस्याही गंभीर झाली असून यावर ‘विद्युत ऊर्जेवर संचालित सार्वजनिक  परिवहन वयवसथा’ हा सक्षम उपाय ठरेल, अशी आशा केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी या वेळी व्यक्त केली. दरम्यान, आज नागपुरात पायाभरणी झालेले नावीनयपूर्ण प्रकल्प देशासाठी पथदर्शी ठरतील, असे मुख्यमंत्री म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...