आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारूड्या नवऱ्याला सोडून भाड्याने राहत होती तरूणी, मालकाने घेतला एकटेपणाचा फायदा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी महेश विजय डफळे (वय २९) याच्याविरुद्ध फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिला पती दारुडा असल्यामुळे डफळे याच्या घरी एकटीच भाड्याने राहत होती. डफळे मुंबई येथे वनविभागात नोकरीला आहे. अधूनमधून अमरावतीला येत असल्याने डफळे याने महिलेच्या एकटेपणाचा गैरफायदा घेऊन जवळीक साधली. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून अनेक दिवस शारिरीक संबंध ठेवले. यातून दोन वेळा गर्भपातही केला. परंतु आता लग्नास नकार देत असल्यामुळे पीडित महिलेने दाखल केलेल्या तक्रारीवरून महेश डफळे विरुद्ध फ्रेजरपुरा पोलिसात गुन्हा दाखल केला. 

बातम्या आणखी आहेत...