आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती: जिल्हाभरात 39,083 विद्यार्थी देणार परीक्षा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला बुधवार, २१ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. या परीक्षेसाठी अमरावती जिल्ह्यात एकूण १२६ परीक्षा केंद्र राहणार आहेत.

 

या केंद्रांवर १९३७० विद्यार्थी तसेच १७७३८ विद्यार्थिनी असे एकूण ३७ हजार १०८ नियमित विद्यार्थी परीक्षा देणार आहे. याचवेळी १ हजार ४७३ मुले व ५०२ मुली, असे एकूण १ हजार ९७५ पुनर्परीक्षार्थी आहेत. नियमित व पुनर्परीक्षार्थी मिळून अमरावती जिल्ह्यात ३९ हजार ८३ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. जिल्ह्यात असलेल्या १२६ परीक्षा केंद्रांपैकी दोन परीक्षा केंद्र उपद्रवी असल्याचे बोर्डाने घोषित केले आहे.

 

बारावी हे विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वाचे वर्ष असते. म्हणूनच बारावीच्या वर्षाला आयुष्याचा 'टर्निंग पॉइंट' असे म्हणतात. यंदा परीक्षेचा पहिला पेपर इंग्रजी विषयाचा असून परीक्षा २० मार्च पर्यंत चालणार आहे. परीक्षा सुरळीत व कॉपीमुक्त वातावरणामध्ये होण्यासाठी व विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यासाठी भयमुक्त, शांत वातावरण राहण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. ज्या विषयाचा पेपर असेल त्या विषयाचे शिक्षक परीक्षा केंद्राचे परिसरात उपस्थित राहणार नाही. संबंधित विषय शिक्षकांनी आपले पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी कार्यालयात पेपरचे अर्धा तास अगोदर ते पेपर संपल्यानंतर अर्धा तास पर्यंतच्या कालावधीमध्ये पूर्णवेळ उपस्थित राहावे लागणार आहे. सर्व गटशिक्षणाधिकारी यांनी याबाबत कार्यवाही करावयाची आहे.

 

..तरी ३ तास मिळणार नाही प्रश्नपत्रिका
अनेकदा परीक्षा देण्यासाठी आलेल्या काही विद्यार्थ्यांचा पेपर अवघ्या तास दीड तासांत पूर्ण होतो, किंवा त्यांना अर्धवट सोडवून बाहेर जायचे असते. या वर्षी अशा विद्यार्थ्याला बाहेर जाण्यापूर्वी उत्तरपत्रिकेसोबत प्रश्नपत्रिका सुद्धा पर्यवेक्षकाकडे जमा करावी लागणार आहे. या प्रश्नपत्रिका त्या विद्यार्थ्याला इतर विद्यार्थ्यांचे पेपर संपल्यावर म्हणजेच तीन तासाने देण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...