आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानवी तस्करीचा संघटित गुन्हेगारीत समावेश, गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांची मा‍हिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - मानवी तस्करी हा गंभीर गुन्हा आहे. ही संघटितरीत्यासुद्धा करण्याचा संशय आहे. यापुढे मानवी तस्करीचा समावेश संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत केला जाईल आणि पावसाळी अधिवेशनातच या संबंधी विधेयक मांडण्यात येईल, अशी माहिती गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांनी विधान परिषदेत दिली. हुस्नबानू खलिफे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावरील चर्चेत ते बोलत होते.


पाटील पुढे म्हणाले, हरवलेल्या व्यक्तींचा तपास करण्यासंदर्भात प्रमाणित कार्यपद्धती तयार केली आहे. या कार्यपद्धतीचा मासिक आढावा घेण्याच्या सूचना राज्यातील सर्व पोलिस आयुक्तांना देण्यात येतील. हरवल्याची कोणतीही तक्रार नव्हती अशा सुमारे १७ हजार मुलींना पोलिसांनी घरी सोडले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १८ वर्षांखालील हरवलेल्या लहान मुलांबाबत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात येतो. त्यामुळे आकडेवारी वाढलेली दिसते, असे राज्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...