आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात चक्रीवादळ, ताशी वेग २० कि.मी.; शहर बनले कचराकुंडी,सर्वत्र धुळच धुळ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- शहरात सायंकाळी ५.३० च्या सुमारास ताशी २० कि.मी. प्रतितास वेगाने चक्रीवादळ आल्याने सर्वत्र धुळच धुळ दिसत होती. सुमारे ४५ मिनिटे मधून मधून वेगाने वारे वाहत होते. यामुळे दिवसभर ४३.८ अंश सेल्सिअसपर्यंत तापमानात बेजार झालेल्या शहरवासियांना दिलासा मिळाला. सायंकाळी हवेत गारवा आला. परिसरात काही ठिकाणी हलका पाऊस झाल्याची माहिती श्री शिवाजी कृषी हवामान केंद्राने दिली. शहरात वेगाने वारे वाहत असल्यामुळे संपूर्ण कचरा उडून रस्त्यावर आला होता. कचरा व धुळीपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी नागरिक सुरक्षित जागा शोधताना दिसले. 


हरियाणा, मध्यप्रदेश, विदर्भ, मराठवाडा, गोवा या प्रदेशावर पूर्व-उत्तर-दक्षिण अशी हवेच्या कमी दाबाची द्रोणीय स्थिती निर्माण झाल्यामुळे तसेच तापमान वाढल्याने वादळाची निर्मिती झाली. त्यामुळे सायंकाळी ४ च्या सुमारास हलके वारे वाहायला लागले. त्यानंतर अचानक वाऱ्याचा जोर वाढला. या वादळाचा वेग ताशी २० कि.मी. प्रतितास असून तो फारसा नुकसानदायक नसल्याचे मत श्री शिवाजी कृषी हवामान केंद्राच्या अनिल बंड यांनी व्यक्त केले. 


वादळासारखी परिस्थिती असल्यामुळे आम्ही आज कार्यालयच सोडले नाही. सज्जता ठेवली. मात्र अद्याप आमच्याकडे झाडे कोसळल्याची किंवा इतर कोणत्याही दुर्घटनेची माहिती मिळाली नसल्याची माहिती अग्निशमन दलाचे अधीक्षक चव्हाण यांनी दिली. वादळाच्या वेगामुळे झाडे कोसळतात की काय असे वाटत होते. वादळी वाऱ्याच्या वेगाने काही काही घरांवरील पत्रे उडाली. धुळाचे लोट रस्त्यावर उडाल्याने काही क्षण दुचाकी वाहनचालकांच्या डोळ्यात धूळ गेल्याने त्यांना काही काळ वाहने थांबवावी लागली. 

बातम्या आणखी आहेत...