आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बायकोच बहिण बनून लावत होती नव-याची लग्नं, फेसबुकमुळे असा झाला खुलासा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर. एक महिलेने संपत्ती हडपण्यासाठी आपल्याच नव-याची 20 लग्ने लावल्याचे प्रकरण समोर आले आहे. पिडित महिलांनी पोलिस आयुक्तांकडे याबाबत तक्रार केली आहे. पोलिस  प्रकरणाचा तपास दोन दिवसांपासून करत आहेत. सध्यातरी आरोपी दांपत्यावर गुन्हा दाखल झालेला नाही, पोलिसांनी सांगितले की  प्रकरण नेमकं काय आहे या बाबत चौकशी केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल. पोलिस आयुक्तांनी लवकर या प्रकरणचा तपास पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर अनेक खळबळजनक गोष्टी उघड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 


माणकापूर येथील एक विधवा महिलेने दोन वर्षांपूर्वी आरोपी पुरुषाशी लग्न केले होते, पण त्यानंतर फेसबुकमुळे त्याचं खरं रुप समोर आलं, पिडित महिलेने सोमवारी पोलिस आयुक्त डाॅ. के व्यंकटेशम यांची भेट घेतली व आरोपीवर कडक कारवाई करण्याची विनंती केली. 

 

दोन वर्षांपूर्वी झालं होतं लग्न 

माणकापुरात राहणा-्या पिडित महिलेने आपली दुखद कहाणी पोलिस आयुक्तांना सांगितली. तिच्या पतीचं 2014 मध्ये दिर्घ आजाराने म-त्यू झाला. तिला दोन मुली आहेत पतीच्या मृत्यूनंतर तिच्या मनामध्ये असुरक्षतेची भावना निर्माण झाली त्यानंतर तिने आपल्या दोन्ही मुलींच्या परवानगीने दुसर लग्न करण्याचा निर्णय घेतला. तिने सेकंड शादी. डाॅट काॅम या साईटवर लग्नासाठी जाहिरात दिली. त्यानंतर 15 दिवसांनी अजय कुंभारे उर्फ आकाश आगरवाल नावाच्या व्यक्तीचा तिला फोन आला. आकाशने तिला सांगितले की त्याची स्वत:ची फॅक्टरी आहे. पत्नी स्मिता एचडीएफसी बॅंकेत मॅनेजर आहे पण आजारपणामुळे तिला मूल होऊ शक नाही. फोन वर चर्चा झाल्यानंतर एक दिवस आकाशने तिला सांगितले की स्मिताचा मृत्यू झाला. त्यानंतर काही दिवसाना तो अचानक पिडितेच्या घरी एक सविता नावाच्या महिलेला घेऊन आला. त्याने पिडितेला सांगितले की ती त्याची बहिण आहे. दोघांशी चर्चा झाल्यानंतर पिडितेने लग्नाचा प्रस्ताव स्विकारला  दोन वर्षांपूर्वी लग्न ही झालं. 


नवरा दाखवू लागला आपला खरा रंग 

- पिडितेने सांगितले, सुरवतीला मन जिंकण्यासाठी आकाश तिच्या दोन्ही मुलींसोबत प्रेमाने वागत राहिला. मात्र नंतर तो आपला खरा रंग दाखवू लागू लागला. एके दिवशी त्याने घरातून पाच लाख रुपये आणि सोन्याचे दागिने गायब केले. याबद्दल त्याला विचारले असता त्याने फॅक्टरीत झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी दागिने विकावे लागणार असल्याचे सांगितेल, परिस्थिती सुधारल्यावर दागिने परत बनवण्याचं आश्वासन सुद्धा दिलं. 

 


फेसबुक फ्रेंडकडून माहिती एेकून सरकली पायाखालची जमीन 

-अजयने एवढा मोठा डल्ला मारल्यानंतर तो पिडितेशी विचित्र वागू लागला. तिली त्याचा संशय आला आणि त्याच्याविषयी माहिती घ्यायला सुरवात केली. अजयच्या ओळखीतील एक निलेश नावाच्या व्यक्तीला ने फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. त्यानंतर त्याला भेटण्यासाठी आपल्या घरी बोलवले. निलेश तोंडून अजयबद्दल एेकून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. निलेशने तिला सांगितले की अजय ने 2006मध्ये बिल्डर फर्मच्या नावावर ब-याच लोकांना चुना लावला आहे. लग्नाच्या वेळी जिला आपली बहिणी म्हणून दाखवले ती त्याची बायको असल्याचा दावाही त्याने केला. 


विधवा व घटस्फोटितांना हेरायचा

निलेश ने सागंतिले, अजयने आता पर्यंत 20 लग्न केली आहेत. ही लग्नं त्याची बायको सवितानेचे लावून दिली आहेत. अजय विधवा महिलेशी लग्न करुन तिची संपत्ती हडप करतो नंतर तिला सोडून देतो. नंतर दोघेही नवीन शिकार शोधायला लागतात. 

 

पिडितेचे घर देखील विकले 

अजयने माणकापूरमध्ये राहणा-या पिडित महिलेचे घर देखील विकले आहे. त्या महिलेला एक रुपयादेखील मिळालेला नाही. अजय आणि सविता यांच्याबरोबर आणखी लोक सामील असण्याची शंका व्यक्त केली जात आहे. 


लग्नाच्या जाहिराती पाहून करतात संपर्क 

अजय आणि सविता वर्तमानपत्र किंवा वेबसाईटवरिल जाहिराती पाहून महिलांशी संपर्क करतात. पण त्याआधी त्या महिले विषयी व तिच्या संपत्ती विषयी माहित काढतात.

 या प्रकरणाचा तपास सुरू आहे, त्यामुळे याबद्दल आत्ताच काही सांगता येणार नाही -डॉ. के. व्यंकटेशम, पोलिस आयुक्त, नागपूर शहर

 

बातम्या आणखी आहेत...