आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आघाडीत न अाल्यास शिवसेनेत फूट पडेल; केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे भाकीत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - भाजप आणि शिवसेनेची गेल्या २५ वर्षांपासून युती आहे. आम्ही त्यात सहभागी आहोत. भाजप व सेनेची युती राहावी अशी अनेकांची इच्छा आहे. सेना सोबत आली नाही तर पक्ष फुटून खासदार, आमदार बाहेर पडतील, असे भाकीत रिपाइंचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वर्तवले. रविभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत आठवलेंनी भाजपसोबत राहणार असल्याचेही स्पष्ट केले.

 

ते म्हणाले, संजय राऊत आणि अनिल देसाई यांच्याशी चर्चा झाली आहे. तेही युतीबाबत सकारात्मक आहेत. उद्धव नाराज असून पंतप्रधानांनी त्यांची नाराजी दूर करावी असे उद्धव यांना वाटते, असे आठवले यांनी सांगितले. बौद्ध परिषदेत माझे भाषण सुरू असताना काही लोकांनी विरोध केला. प्रसिद्धीसाठी काही लोक अशी कामे करतात. आम्ही भाजपसोबत आहोत. पटत नसेल त्यांनी येऊ नये, अशी समज त्यांनी विरोधकांना दिली.

 

अॅट्रॉसिटीबाबत पावसाळी अधिवेशनात विधेयक 
अॅट्रॉसिटी आणि पदोन्नतीत आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टाने मूळ प्रकरणाचा निकाल देणे अपेक्षित होते. संपूर्ण कायद्यासंदर्भात दिलेला निकाल योग्य ठरणारा नाही. त्यामुळे अॅट्रॉसिटी आणि पदोन्नतीत आरक्षणाबाबत येत्या पावसाळी अधिवेशनात विधेयक मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

बातम्या आणखी आहेत...