आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांचा भूसुरुंग स्फोटाचा कट उधळला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - गडचिरोली जिल्ह्यातील मुरूमगावात नक्षलवाद्यांनी रचलेला भूसुरुंग स्फोटाचा कट पोलिसांनी उधळला आहे. नक्षलवाद्यांनी पोलिस आणि पंचायत समिती सभापतीवर निशाणा साधत भूसुरुंग पेरून ठेवले होते. रविवारी सायंकाळी पोलिसांच्या हे लक्षात आले. दहशतीमुळे गावकरी व पोलिसांनी रात्र जागून काढली. सोमवारी सकाळी ८ वाजता बाॅम्बशोधक व नाशक पथकाने दोन भूसुरुंग काढून निष्क्रिय केले.

 

रविवारी सायंकाळी खेळत असलेल्या मुलांना जमिनीतून केबल बाहेर आल्याचे दिसले. तिथे जवळच पंचायत समिती सभापती अजमन रावते व सी-६० पथकातील कर्मचाऱ्यांचे निवासस्थान आहे. मुलांनी सांगितल्यावर गावकऱ्यांनी लगेच पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी लागलीच पाहणी केली असता भूसुरुंग पेरला असल्याचा संशय बळावला.   सोमवारी पहाटेच पोलिसांनी संपूर्ण परिसर रिकामा केला व दोन भूसुरुंग बाहेर काढून निष्क्रिय केले.

बातम्या आणखी आहेत...