आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपक्ष उमेदवाराने प्रचार पत्रकातच दिल्या निलगीरी अाणि झेंडूच्या बीया

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- निवडणूक म्हटले की पहिल्यांदा नजरेसमोर येतो बेसमार खर्च, धुराळा उडवीत जाणाऱ्या गाड्यांचा ताफा...हजारो कार्यकर्ते, ढोलताशे...विरोधकांवर सडकून टीका वगैरे. पण असा कोणताही गदाराेळ न करता एक अपक्ष उमेदवार चक्क पर्यावरणपूरक प्रचार करीत आहे. गाड्यांचा ताफा न बाळगता पायी फिरून आपली प्रचार पत्रके मतदारांना वाटीत आहे.   हॅण्डमेड कागदावर छापलेल्या पत्रकात निलगीरी व झेंडूची बियाणे टाकण्यात आले आहे. त्यामुळे प्रचारासोबत निसर्गाची काळजी घेणाऱ्या या अपक्ष उमेदवाराचे कौतुक होत आहे. हे प्रचार पत्रक रात्रभर पाण्यात ठेवून सकाळी जमिनीत लावले की त्यातून रोप लागते, असे उमेदवार सुहास फुंडे यांनी सांगितले. 


भंडारा गोंदिया मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी येत्या २८ मे रोजी मतदान होत आहे. मुख्य लढत भाजपा आणि राष्ट्रवादीमध्येच होत असली तरी इतरही उमेदवार आपापल्या परीने प्रचार करीत आहे. अर्थातच राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांचा खर्चही तेवढाच मोठा आहे. उमेदवारांचा खर्च तेथे पक्षातर्फे करण्यात येतो. पण अपक्ष म्हटले की, स्वत:चा खर्च स्वत:च करावा लागतो. प्रचारातून समाजकार्यही व्हावे या हेतूने लाखनी तालुक्यातील पिंपळगाव येथील अपक्ष उमेदवार सुहास फुंडे हे पर्यावरण पूरक प्रचार करीत आहेत. 


अपक्ष उमेदवार असलेले सुहास फुंडे हे गावोगावी जाऊन प्रत्येक मतदाराच्या हातात आपल्या प्रचाराचे पत्रक देतात. या पत्रकातच बीज टाकण्यात आले अाहे. त्यामुळे वाचल्यानंतर ते रात्रभर पाण्यात ठेवून जमिनीत टाकल्यास त्यात असलेल्या बीजापासून रोप तयार होण्याची शक्कल या अपक्ष उमेदवाराने लढविली आहे. आज प्रचारा दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहनांचा वापर होऊन प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होते. त्यामुळे प्रचार केवळ पायी चालून करण्याचा निर्धार या उमेदवाराने केलेला आहे. वनखात्याने झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देत वृक्षारोपणाची मोहीम हाती घेतली आहे. त्याला पुरक असा फुंडे यांचा प्रचार आहे. त्यांना एका पत्रकाकरिता ३ ते ४ रुपये एवढा खर्च आलेला आहे. हा पर्यावरण पूरक प्रचार मतदारांमध्ये चर्चेचा विषय आहे. 

बातम्या आणखी आहेत...