आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर: कामठी भागात कारमध्ये 6 वर्षाच्या मुलीवर बलात्कार; नराधमाच्या मुसक्या आवळल्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- जुनी कामठी भागात 50 वर्षीय व्यक्तीने 6 वर्षीय मुलीवर पाशवी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विलास रामचंद्र वाहुरकलर असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

 

सूत्रांनुसार, आरोपी येरखेडा, कामठी येथील राहाणारा असून त्याने घराजवळच खेळणाऱ्या मुलीला जवळ बोलावले. तिला बाजूला उभ्या असलेल्या कारमध्ये बोलावून तिच्यावर बलात्कार केला. रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. पीडित मुलीने घरी गेल्यानंतर आई-वडिलांना आपबिती सांगितली, त्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली.

 

पीडितेच्या आई-वडिलांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून जुनी कामठी पोलिसांनी विलास वाहुरकर याच्यावर पोक्सो अॅक्टनुसार अटक केली आहे. 

बातम्या आणखी आहेत...