आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: नागपूर विधिमंडळाच्या इमारतीत घुसले पाणी..बत्ती गुल..इतिहारात पहिल्यांदा कामकाज बंद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा विधानभवनाच्या इमारतीत पावसाचे पाणी घुसल्याने कामकाज बंद करण्याची नामुष्की राज्य सरकारवर ओढवली आहे. विधिमंडळ परिसर तसेच इमारतीच्या तळघात पावसाचे पाणी घुसले आहे. वीज गुल झाली असून दोन्ही सभागृहाचे कामकाज सोमवारपर्यंत (9 जुलै) स्थगित करण्‍यात आले आहे.

 

‍विधिमंडळ परिसरातील पाण्याचा निचरा करणार्‍या नाल्यात प्लास्टिक पिशव्या, दारु, बीअरच्या बाटल्यांचा खच सापडला आहे. त्यामुळे परिसरात पाणी तुंबल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले की, अवघ्या अडीच तासांच्या पावसामुळे पूर्ण रस्ते ब्लॉक होतात, काहीही कारण नसताना ऐन पावसाळ्यात नागपुरात अधिवेशन घेणे, त्यावर कहर म्हणजे कोणतेही नियोजन नसल्याने कामकाज होऊ शकत नाही. हे सरकारचे मोठे अपयश आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा अशी घटना होत आहे.

 

विधिमंडळाच्या कंट्रोल रूममध्ये पाणी शिरल्याने तेथील वीज गेलेली आहे. पाण्याचा पूर्ण निचरा होईपर्यंत वीज सुरळीत होऊ शकणार नाही. रामनगर परिसरात गुडघाभर पाणी साचले आहे. धनंजय मुंडे म्हणाले की, विरोधी पक्षनेत्यांचे बंगलेही या पावसात पूर्णपणे गळू लागले आहेत. बंगल्याच्या आवारात कंबरेएवढे पाणी साचले आहे. पाणी काढण्यासाठी किमान अडीच तास लागतील अशी सूत्रांची माहिती आहे.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा....संबंधित आणखी Photos व Videos...

बातम्या आणखी आहेत...