Home | Maharashtra | Vidarva | Nagpur | Baba Ramdev Comment on Rahul Gandhis Magic Of zappi With Narendra Modi

‘राजकारणात विरोधासाठी विरोध नको, विरोध मुद्द्यांवर आधारित असावा’; 'त्या' गळाभेटीवर रामदेवबाबांचे मत

प्रतिनिधी | Update - Jul 21, 2018, 08:27 PM IST

रामदेव बाबा यांनी "राजकारणात विरोधासाठी विरोध नको तर विरोध हा मुद्द्यांवर आधारित असावा' या शब्दात गळाभेटीवर भाष्य केले.

  • Baba Ramdev Comment on Rahul Gandhis Magic Of zappi With Narendra Modi

    नागपूर- काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना भर संसदेत मारलेली मिठी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली असताना योगगुरू रामदेव बाबा यांनी "राजकारणात विरोधासाठी विरोध नको तर विरोध हा मुद्द्यांवर आधारित असावा' या शब्दात या गळाभेटीवर आपले भाष्य केले.

    पतंजलीच्या बैठकीसाठी रामदेवबाबा शनिवारी नागपुरात होते. विमानतळावर प्रसार माध्यमांशी बोलताना रामदेवबाबा यांनी केवळ मोदी आणि राहुल गांधी यांच्या गळाभेटीवरच भाष्य केले. राजकारणात विरोधासाठी विरोध असता कामा नये, असे सांगून रामदेवबाबा म्हणाले, कुठलाही पाठिंबा किंवा विरोध हा मुद्द्यांवर आधारित असला पाहिजे. मनापासून कोणाचा विरोध होऊ नये. तो आदर्श तसेच धोरणांपुरता मर्यादित असावा. राजकारण हा आकड्यांचा वेगळा खेळ आहे. त्यामुळे 2099 च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नेमका कोण देशातील जनतेचे हृदय जिंकतो, हे आगामी काळच सांगू शकेल, असे मतही त्यांनी मांडले.

Trending