आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक...अॅम्ब्युलन्सचा दरवाजा झाला लॉक, श्वास गुदमरल्याने चिमुरड्याचा मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोंदिया/रायपूर- एका चिमुरड्याने रुग्णालयाच्या उंबरठ्यावरच प्राण सोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वेळेत उपचार न मिळाल्याने नव्हे तर अॅम्बुलन्सचा दरवाजा लॉक झाल्याने चिमुरड्याचा गुदमरुन मृत्यू झाला आहे. छत्तीसगडची राजधानी रायपूर येथील डॉ.भीमराव आंबेडकर शासकीय रुग्णालयात आज (मंगळवार) ही घटना घडली. अॅम्ब्युलन्स रुग्णालयात पोहोचताच तिचा दरवाजा लॉक झाला आणि त्यात चिमुरड्याचा गुदमरून मृत्यू झाला.

 

बिहारमधील गया येथील रहिवासी अम्बिका कुमार हे आपल्या दोन महिन्यांच्या मुलावर उपचारासाठी रेल्वेने रायपूर येथे पोहोचले. अम्बिका कुमार यांच्यासोबत त्यांची पत्नीही होती. मुलाला आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्‍यासाठी त्यांनी सरकारी अॅम्ब्युलन्स संजीवनी एक्सप्रेसने रवाना झाले. रुग्णालयाच्या आवारात  अॅम्ब्युलन्स पोहोचली असता तिचा दरवाजा लॉक झाला.

 

तब्बल दीड तास कसरत केल्यानंतरही अॅम्ब्युलन्सचा दरवाजा उघडला नाही. अम्बिका कुमार यांनी अॅम्ब्युलन्सच्या दरवाज्याचा काच फोडण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना त्यांना शासकीय मालमत्तेचे नुकसान करता येणार नाही, असे सांगून रोखण्यात आले. आणि यातच मुलाचा गुदमरुन मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...