आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्याचे निर्णय ठाकरेंना मुंबईत बसून घेऊ द्या, भाजपचे आमदार आशिष देशमुख यांची टीका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर-  विदर्भाचेच नव्हे, तर संपूर्ण राज्याचे निर्णय मुंबईत बसून करण्याची उद्धव ठाकरे यांना हौस आहे. त्यांची हौसच पुरवायची असेल तर विदर्भाचे राज्य वेगळे करून उर्वरित महाराष्ट्राचे निर्णय उद्धव ठाकरे यांना मुंबईत बसून करण्याची सोय उपलब्ध करून द्यावी, अशी टीका भाजपचे विदर्भवादी आमदार आशिष देशमुख यांनी केली आहे. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्याच्या सरकारच्या निर्णयाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दर्शवलेला विरोध अनाठायी आणि त्यांचा विदर्भाप्रती असलेला आकस व्यक्त करणारा आहे, असेही ते म्हणाले.    


विदर्भाच्या हिताचे निर्णय मुंबईत बसून घेता येऊ शकतात. त्यामुळे मुंबईतच पावसाळी अधिवेशन व्हावे, या उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलेल्या मतामागे कोणती तर्कबुद्धी कारणीभूत आहे, हे कळायला मार्ग नाही. नागपूर करारान्वये विदर्भ महाराष्ट्रात विलीन झाल्यानंतर दरवर्षी सहा आठवड्यांचे अधिवेशन नागपुरात व्हावे, असे ठरले होते. मात्र, गेल्या साठ वर्षांपासून तसे कधीही घडले नाही. नागपुरात किमान महिनाभराचे पावसाळी अधिवेशन तरी घ्यावे, अशी त्यांनी मागणी केली.

बातम्या आणखी आहेत...