आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून नागपूर विद्यापीठाच्या माजी प्र-कुलगुरुंवर विनयभंगाचा गुन्हा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- विद्यार्थिनीच्या तक्रारीनंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरु डॉ. गौरीशंकर पाराशर यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपुरातील अंबाझरी पोलिस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे. पीडीत विद्यार्थिनी एमएड करत आहे.

 

काय आहे हे प्रकरण?

मी विद्यापीठात एमएड करत होते. हिंदी विभाग प्रमुखांच्या केबिनमध्ये गौरीशंकर पाराशर यांनी आपला विनयभंग केल्याचा आरोप विद्यार्थिनीने केला आहे. घटना घडली तेव्हा गौरीशंकर पाराशर निवृत्त झाले होते. मात्र, ते विभागप्रमुखांच्या केबिनमध्ये येऊन बसत. असेही तिने पोलिस तक्रारीत म्हटले आहे.

 

हिंदी विभाग प्रमुखांनाही केले आरोपी..

या प्रकरणात पोलिसांनी हिंदी विभागाच्या तत्कालीन विभागप्रमुखांनाही आरोपी केले आहे. पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. अद्याप या प्रकरणी कोणालाही अटक झालेली नाही.

बातम्या आणखी आहेत...