आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंद्रपूरात लाक्षणिक उपोषणाला बसलेल्या काँग्रेस नेत्यांचा मंच कोसळला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- उपोषणाला बसलेल्या नेत्यांनी मंचावरच गर्दी केल्याने चक्क मंच कोसळल्याची घटना चंद्रपूर येथे काँग्रेसच्या आंदोलनात घडली. काँग्रेस नेत्यांनी परिस्थिती सावरून घेत मंच कोसळला तरी पक्ष मजबूत आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी बोलताना दिली.

 

जिल्हा काँग्रेसच्या वतीने चंद्रपुरातील जटपुरा गेट येथील महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ उपोषण आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात काँग्रेसचे नेते  सहभागी झाले होते. दुपारी बाराच्या सुमारास आंदोलनाच्या मंचावर नेत्यांची प्रचंड गर्दी होऊन मंचच कोसळला. गर्दी करणारे नेते खाली पडले. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. आंदोलनस्थळी जमलेल्या कार्यकर्त्यांना शांत करण्यात आले. या घटनेनंतर काँग्रेसचे विधानसभेतील उपनेते विजय वडेट्टीवार आंदोलनस्थळी पोहोचले. कोसळलेल्या मंचावरच त्यांनी बसून कार्यकर्त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मंच कोसळला तरी काँग्रेस पक्ष मजबूत असल्याचे सांगत वडेट्टीवार यांनी परिस्थिती सावरून घेतली. दरम्यान, काँग्रेसच्या येथील आंदोलनालाही गटबाजीचे गालबोट लागले. पुलगिया गट या आंदोलनात सहभागी झाला नसल्याचे आढळून आले.

बातम्या आणखी आहेत...